कोमट पाणी पिण्याचे फायदे आणि हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमची आवश्यकता
आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. तर आज आम्ही कोमट पाणी पिण्याच्या १० फायद्यांविषयी सांगणार आहोत...
* फायदे :*
*१) पोट कमी करा :* रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते.
*२) सर्दी-पडसे दूर :* कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी पडशाची समस्या दूर होते.
*३) दम्याची समस्या नियंत्रित :* रोज कोमट पाणी प्यायल्याने घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते.
*४) स्नायुदुखी कमी :* कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू आखडतात आणि वेदना होतात.
*५) किडनीसाठी चांगले :* रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो.
*६) घाण निघते :* रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते.
*७) अॅसिडिटी दूर करते :* रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरामधील अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे अॅसिडिटीची समस्या दूर होते.
*८) भूक वाढवते :* रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते.
*९) पचनक्रिया सुधारते :* रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होते.
*१०) त्वचा चांगली राहते :* रोज कोमट पाणी प्यायल्याने घामाच्या माध्यमातून त्वचेमधील घाण बाहेर पडते. स्किन इन्फेक्शनचा धोका टळतो.
➖➖🏻🏻➖➖
हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शिअमची आवश्यकता
आपल्या शरीराच्या वजनाच्या १.५ टक्के भाग कॅल्शिअमने व्यापलेला असतो. आपण जे पदार्थ खातो त्यातील दही, पनीर, दुध, चीझ, सोया, बदाम, संत्री, खोबरे, पालक, कोबी, खजूर, जरदाळ, नाचणी, उडीद डाळ, मुगडाळ, सोयाबीन, तीळ, चिकू अशा पदार्थामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते.
आपल्या शरीरात हाडं तयार होण्यासाठी कॅल्शिअमची गरज लागते. कॅल्शिअममुळे हाडे बळकट होतात. वयाच्या २० वर्षापर्यंत हाडांची वाढ होत असते म्हणून आपली उंची वयाच्या अंदाजे २० ते २१ वर्षापर्यंत वाढते. चाळीशीनंतर आपल्या हाडांची झीज व्हायला सुरुवात होते. हाडे, मणके यातील ताकद, त्याचबरोबर हृदय आणि इतर स्नायूंचे कामकाज सुरळीत पणे चालण्यासाठी कॅल्शिअमची आवश्यकता असते. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत आणि शरीरातील असंख्य भागांमध्ये कॅल्शिअम महत्त्वाची भूमिका बजावते.
कॅल्शिअम शरीरातील व्हिटामिन डी, थायरॉइड हार्मोन या द्वारे नियंत्रित केले जाते. या घटकांमुळे शरीरातील व रक्तातील कॅल्शिअमचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळे आपणास व्हिटामिन डी मिळते. याची कमतरता झाल्यास हाडे ठिसूळ होतात. जास्त प्रमाणात घेतलेले मीठ उच्चरक्तदाबाला निमंत्रण देतं आणि हव्या असलेल्या कॅल्शिअमला शरीराच्या बाहेरचा रस्ता दाखवते. चहा-कॉफीचं सतत सेवन सुद्धा आरोग्यासाठी हानिकारक असते. चहातील टॅनिन आणि कॉफीतील कॅफेन यांच्यामुळे शरीरातील कॅल्शिअम कमी होते.
शरीरात ज्यावेळी कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते, त्या स्थितीला "हायपोकॅल्सेमिया" असे म्हणतात. यामध्ये स्नायू आकुंचन पावतात आणि हाडांमधील कॅल्शिअम रक्तामध्ये ओढले जाऊन ते ह्र्दय, मेंदू, नसांना पुरविले जाते, त्यामुळे आपली हाडे ठिसूळ होत जातात. तर जास्तीत जास्त कॅल्शिअमयुक्त पदार्थ खाऊन ही कॅल्शिअमची झीज भरून काढता येते. पण कॅल्शिअमयुक्त आहार हा एकाच वेळेस न घेता दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात घ्यावा जेणे करून कॅल्शिअम शरीरात शोषला जातो. तसेच शरीसाठी घेतलेला कॅल्शिअम हाडांपर्यंत पोहचण्यासाठी व्यायाम ही तितकाच आवश्यक आहे.
0 Comments