Importance of God Name

 नामस्मरणाचे महत्व 


                                  नामस्मरणाचे काय महत्व असते ते एका छोट्याशा उदाहरणाद्वारे सांगितले आहे.पुराणकथांमध्ये अशी एक कथा सांगितली जाते की, एक मनुष्य होता आणि त्याला व्यसने होती चांगल्या सवयी नव्हत्या आयुष्यभर जास्त वाईट कामे केली विचार केला.तो मनुष्य जेव्हा म्हातारा झाला संपूर्ण शरीर थकले आणि मरणात जवळ आला तेव्हा त्याच्या जवळ त्याचे असे कोणीही नव्हते कारण यासाठी तो स्वतः जबाबदार होता. त्याच्याजवळ मात्र एक पोपट होता. जो त्याने पाहिलेला होता बरीच वर्षे तो त्या पोपटाचा चांगला सांभाळ करीत असे त्याने पोपटाचे नाव राघव असे ठेवले होते.

                                     जेंव्हा त्याचा मरणाचा अंतिम क्षण जवळ आला तेव्हा पोपटाला म्हणायला लागला राघवा आता मी जाणार आहे आता तुला खायला कोण देणार ? आता तुला पाणी कोण देणार? तुझा आता सांभाळ कोण करणार? असे म्हणत जागवार राघवा, राघवा, राघवा म्हणत त्याने शेवटी आपला प्राण सोडला.
                                    आता या मनुष्याने आयुष्यात बरीच दुष्कर्मे केल्यामुळे त्याचे नरकात जाणे जवळजवळ निश्चितच होते.  त्या मनुष्याने प्राण सोडल्यावर तिथे  यमदूत आले त्याला नरकात न्यायला कारण त्याचे दुष्कर्मे होती. पण त्याच वेळी तिथे  देवदूत पण येतात यमदूत देवदूतांना विचारतात की तुम्ही येथे कसे काय देवदूत म्हणतात आम्ही या मनुष्याला देवलोकात न्यायला आलो आहे. यमदूत म्हणतात ते कसे काय शक्य आहे. या मनुष्याने तर आयुष्यात बरीच दुष्कर्मे केली आहेत. त्यामुळे हा मनुष्य नरकातच जाईल माझ्याबरोबर. देवदूत म्हणतात त्या मनुष्याने मरणाच्या शेवटी काही दिवस आणि मारतानाआमच्या देवाचे नाव घेतले नारायणा चे नाव घेतले त्यामुळे आमचे देव यामुळे यावर फार खुश झालेत त्यामुळे मला त्यांनी याला देवलोकात घेऊन यायला सांगितले आहे.
यमदूत म्हणतात पण राघव हे नाव तर त्या पोपटाचे होते. राघवा असे देवांचे सुद्धा नाव आहे त्यामुळे ते मला माहित नाही या मनुष्याला आम्ही देवलोकात घेऊन जाणारच.
                                अशा प्रकारे आपल्याला या कथा द्वारे असे दिसून येते की नकळतपणे अजाणतेपणे ईश्वराचे नाव घेतले तरी ईश्वर त्या मनुष्यावर  खूप झाले आणि त्याला मुक्ती दिल. तसेच जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव जर जाणून मुद्दाम घेतले तर त्यांना ते किती आवडेल नक्कीच महाराजांना हे आवडेल कारण ईश्वराचे नामस्मरण करणे हा भक्तिमार्ग सर्वात सोपा आहे. आपण महाराजांचे नाव कधीही कोठेही घेऊ शकतो नामस्मरणाचा महिमा फार मोठा आहे मी येथेथोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद.


Post a Comment

0 Comments