श्री गुरूंचे जीवनातील महत्व
समजा एक वस्तू आपण नदी मध्ये सोडली तर त्या वस्तू ला अंतिमस्थाना पर्यंत पोचायला किंवा ध्येयपर्यंत पोचायला थोडा वेळ लागेल. कारण ती वस्तू प्रवाहाबरोबर जाईल जाताना त्या वस्तू ला धक्के खावे लागतील मध्ये मध्ये अडखळत ती वस्तू अंतिम ध्येयपर्यंत पोहचेल. आणि समजा आपण ती वस्तू एका नावेमधे बोटीमध्ये ठेऊन दिली तर ती वस्तू तिच्या अंतिम ध्येयपर्यंत अगदी लवकर , सुरक्षितरित्या न अडखळत पोहचेल.
तसेच आपल्या जीवनाचे सुद्धा आहे. समजा आपण आपले जीवन विना गुरु मार्गदर्शनाशिवाय विना गुरुभक्ती करता जगू लागलो तर काय होते. आपण जीवन जगू आपण आपल्या अंतिम ध्येयपर्यंत पोचू पण त्याला त्या वस्तू प्रमाणे वेळ लागेल. धक्के खावे लागतील त्रास होईल. पण जरआपण आपल्या आपल्या जीवनात गुरु रुपी नावेच बोटीचा जर उपयोग केला या गुरु रुपी बोटीमध्ये बसून जर आपण जीवन जगू लागलो म्हणजेच गुरु भक्ती आणि गुरूंच्या मार्गदर्शन अनुसार जीवन जगू लागलो तर आपण आपल्या अंतिम ध्येयपर्यंत ईश्वर प्राप्ती पर्यंत लवकर पोचू. आपण थोडा त्रास येथेही होईल पण त्यासाठी जी सहनशक्ती समजूतदार पणा लागेल तो आपल्याला आपल्या गुरूकडून निश्चितच मिळत जातो.
म्हणून प्रत्येकाने आपली जीवनात गुरूंचे महत्व ओळखून गुरु भक्ती केली पाहिजे. त्याचे नाम घेतले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन सुखी समृद्ध होईल आणि आपली जीवनाचा उद्देश सफल होईल.
0 Comments