महाराज आपल्यावर कृपा नाही करत असे वाटत का? Shri swami samarth

 महाराज आपल्यावर कृपा नाही करत असे वाटत का?


नमस्कार भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण रोज पाहत असतो की बर्याचजणांना महाराजांचे चांगले अनुभव येत असतात.त्यामुळे सहजच आपल्या मनात विचार येऊन जातो की महाराज आपल्यावर कृपा करायला वेळ का लावतात किंवा आपल्यावर कृपा करतात की नाही.जेव्हा आपल्या मनात असा विचार येईल तेव्हा आपण असा विचार करायला हवा की जेव्हा आपण रात्री झोपी जातो तेव्हा आपण सकाळी उठणार की नाही हे आपल्याला माहीत असते का? नाही ना मग जेव्हा सकाळी आपण सुरक्षित रित्या उठतो तेव्हा आपण हे लक्षात घ्यायला हवे की आपणावर ही तर महाराजांची स्तर कृपा आहे. आपणाला सकाळपासून ते रात्रीपर्यंत सर्वकाही खायला-प्यायला मिळते तेव्हा परत रात्री झोपी जाताना आपण लक्षात घ्यायला हवे की ही महाराजांचीच कृपा आहे.आपण सकाळी उठतो दिवसभर आपणाला सर्व काही मिळते हे कोणामुळे? येथे आपण काही करत असतो का ?आपणाला असे वाटत असते की हे तर सर्व काही मीच करत आहे. आपण हे विसरलेलो असतो की महाराज सर्वकाही करत आहेत यासाठी आपण महाराजांना किती धन्यवाद द्यायला हवे? खरे म्हणजे आपण सकाळी उठतो आपल्याला नवीन दिवस दाखवला आपण अजून जिवंत आहे हीच किती मोठी खूप आहे महाराजांची आपल्यावर हे आपण रोज लक्षात ठेवायला आठवायला हवे जी कृपा आपल्यावर होत आहे ते आपण विसरून जातो आणि दुसरे कृपा कधी होणार यासाठी आपण दुःखी होऊन बसलेले असतो.काही काही वेळेला खूप पाहण्यासाठी थोडा वेळ लागतो पण महाराजांनी कृपा लवकर करणे ही पण एक प्रकारची कृपाच असते.Shri swami samarth



आजच्या या युगात प्रत्येक जण मोबाईल इंटरनेट टीव्ही यामध्ये इतका गुंतला आहे की या विषयावर बोलावे तेवढे कमीच आहे ही सर्व एक प्रकारची मायाच आहे. जी आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर नेता आहे या सर्व मोबाईल टीव्ही मध्ये आपला एवढा वेळ चालला आहे की दिवस आठवडे महिने वर्षे चालले आहेत.यामध्ये बऱ्याच जणांना परमेश्वराचे महाराजांचे नामस्मरण करायला वेळ फारच मुश्किलीने मिळत आहे ही एक मायाच आहे. हे आपण ओळखायला हवे आणि महाराजांचे रोज नामस्मरण करायला हवी कारण आपण या दुनियेतून जाताना फक्त आणि फक्त जे काय आपण चांगली कर्मे केली आहेत तीच बरोबर घेऊन जाणार आहोत.Shri swami samarth

आपल्याला लाभलेले हे आयुष्य आपण बऱ्याच हलक्या तऱ्हेने लाईटली घेत आहोत मनुष्य जन्म मिळणे हे पण एक भाग्यच आहे. मनुष्य जन्मातच मुक्ती मिळू शकते कारण मनुष्यच विचार करू शकतो बऱ्याच जणांना असे वाटत असते की मुक्ती हि गोष्ट मेल्यानंतरची असते. त्याचा आता विचार का करावा ?पण जी गोष्ट हे शरीर नष्ट झाल्यावर मिळणार आहे त्याची तयारी आतापासूनच करावी लागते आणि ही संधी आपल्याला मनुष्यजन्म मिळून मिळालेले आहे. त्याचे आपण सार्थक करायला हवेत त्यासाठी आपण महाराजांची भक्ती करायला हवी आपण आपला वेळ चांगली कर्म करण्यासाठी द्यायला हवा धन्यवाद ….! Shri swami samarth

=========================================================================

आपल्याला लवकर फळ मिळण्यासाठी काय केले पाहिजे  Shri swami samarth

Post a Comment

0 Comments