पुनर्जन्म,Rebirth,Gurudev Datta

|| श्री गुरुदेव दत्त ||

पुनर्जन्म (Rebirth) हा सध्याच्या काळात विवादास्पद मुद्दा वाटला तरी पुनर्जन्म आहे हे दत्त महाराजांनी सर्वत्र सांगितले आहे . गुरुचरित्रात अनेक जागी पुनर्जन्मावरील उदाहरणे आढळतात . मागील सात आणि पुढील सात जन्मांचा उल्लेख असणारा हा एकमेव ग्रंथराज आहे .

पुनर्जन्माच्या (Rebirth) उल्लेखाची सुरुवात रजकाच्या अध्यायापासून झाली आहे . ह्या जन्मात वृद्धावस्था आल्याने पुढील जन्मी राजयोग असावा हे त्याचे मागणे श्रीपाद श्रीवल्लभ दत्त महाराजांनी मान्य केले आणि पुढील जन्मी तो बिदर ( वैदूर ) नगरीचा राजा झाला .

मदोन्मत्त ब्राह्मणांना धडा शिकवताना सात रेषा ओलांडून आलेल्या मनुष्याला मागील सात जन्माचे ज्ञान झाले तर विमर्षण राजाने पुढील सात जन्म आपले कसे असतील याचे विवेचन आपल्या राणीला केले . हे झाले मागील आणि पुढील जन्मातील मनुष्य योनीचे भूत आणि भविष्य कथन . (Rebirth)

वामदेवांच्या अंगाला लागलेल्या भस्म स्पर्शाने पावन झालेल्या ब्रह्मराक्षसाला आपण कितीतरी अधम योनी भोगल्याचे आठवले . याचे भयावह कथन पाप कर्माने किती नाना तऱ्हेच्या योनींना मनुष्याला सामोरे जावे लागते हे दाखवून देते. (Rebirth) .

ह्या जन्मात मी कोणाचे वाईट केले नाही तर माझे कसे वाईट झाले हा प्रश्न विचारणाऱ्या वर्गाला हा पुनर्जन्म (Rebirth) सिद्धांत विचार करायला लावणारा आहे . अनेक जन्मीच्या पाप कर्माचे संचित आपण सोबत घेऊन येतो आणि इथे भोगताना केवळ ह्याच जन्माचा विचार करतो . Rebirth,Gurudev Datta

.दत्त भक्तीचे वैशिष्ठ्य म्हणजे दत्त महाराज उत्तरोत्तर उत्तम योनीत जन्म देऊन अंती मोक्ष देतात . याचे उदाहरण दत्त पुराणात अर्थात ओघाने दत्त माहात्म्यात आले आहे .इंद्र आणि देव गुरु बृहस्पती यांच्या संवादात सात गाथा आल्या आहेत . यातील एका गाथेत एका शिल्पज्ञाचा उत्तरोत्तर उत्तम योनीत कसा प्रवास होतो आणि अंती त्याला मोक्ष अर्थात शाश्वत पदाची कशी प्राप्ती होते याचे वर्णन आहे. (Rebirth) Rebirth,Gurudev Datta

अत्यंत कठीण असा योग जमत नसेल ,यज्ञयाग करणे आवाक्याबाहेर असेल ,तीर्थयात्रा घडू शकत नसतील तरी काही हरकत नाही . मनोभावे दत्त महाराजांचे हरघडी झालेले स्मरण पुरेसे आहे . (Rebirth) Rebirth, Gurudev Datta

!!! श्री गुरुदेव दत्त !!!

     

Post a Comment

0 Comments