कृती आणि भावना | Act and spirit

 

कृती आणि भावना


                 आपल्या कृतीपेक्षा आपल्या मनामध्ये असलेली भावना ही फारच महत्त्वाची असते. आपल्या कृतीपेक्षा आपल्याला आपल्या भावी नेते फळ चांगले मिळत असते म्हणून आपण असे ऐकत आलो आहोत की कोणतेही काम हे मनापासून करावे म्हणजे ते नेहमी चांगले होते.

                समजा आपण एखादे काम करत आहे किंवा कोणाला तरी मदत करत आहे वरून तर आपण अत्यंत चांगले काम करत आहे असेच सर्वांना दिसत आहे. पण मनातून आपण असा विचार करत आहे की मी कुठे बसलो मला येते थांबायलाच नको होते आता मला घरी किंवा ऑफिसला जायला उशीर होईल वगैरे. येथे आपली कृती तर चांगली आहे पण आपले विचार भावना चांगली नाही आपण फक्त दुसऱ्यांना दाखवायला हे करत आहोत आहेअसाच याचा अर्थ होतो त्यामुळे याचे जे फळ आपल्याला मिळायला हवी ते मिळत नाही. मिळाले तर पूर्ण फळ मिळत नाही म्हणजे कामात चुका वगैरे होतात आपली भावना जर चांगली नसेल तर याचा परिणाम आपल्या वागण्यावर बोलण्यावर होत असतो पण यावेळी आपल्या हे लक्षात येत नाही.

               म्हणून जेव्हा कधी एखादे आपले काम झाले नाही किंवा एखादी व्यक्ती आपल्या बरोबर चांगली वागली नाही तर आपण त्या व्यक्तीला ईश्वराला दोष देतो ईश्वराला श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण एखादे काम तेव्हा कसे करत आहोत हे लगेच समजते म्हणूनच म्हटले आहे कि देव हा भावाचा भुकेला आहे.

              आई-वडील शिक्षक मुलांना मारतात येथे कोणती चांगली दिसत नसली तरी येथे आई-वडील प्रेक्षकांच्या भाव मात्र अत्यंत चांगला असतो. मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात त्यांनी सर्वांनी चांगले वागावे इत्यादी येथे आपल्याला कृती बघून कसे चालेल तसेच लहान मुलांना आकाशात उडणारा लाल रंगाचा फुगा जास्त आवडतो पण जमिनीवर पडलेला हिरव्या रंगाचा फोटो आवडत नाही. त्यांना वाटते त्याला लाल रंग आहे म्हणून तो उडत आहे, आणि दुसरा फुग्यात रंग हिरवा आहे. म्हणून तो खाली पडला आहेपण तेथे मुलांना हे माहीत नसते की थोडा लाल रंगामुळे आकाशात उडत नाही तर त्याच्या आत मध्ये जे काही आहे केस वगैरे त्यामुळे तो उडत आहे तसेच मनुष्य तेसुद्धा आहे. आपल्या कृतीपेक्षा आपल्या आत मध्ये काय आहे आपली भावना कशी आहे त्यावर आपली प्रगती महाराजांची कृपा अवलंबून आहे.

                म्हणून आपण कोणतेही काम करताना चांगल्या भावनेने करूया आपण जगापासून लपून शकतो, पण श्री स्वामी समर्थ महाराजांना सगळे समजते ते आपली भावना काय आहे हेच बघत असतात अशा प्रकारे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्ती सेवा मनापासून चांगल्या भावनेने करू या.

धन्यवाद...! 

Post a Comment

0 Comments