आपण मंदिरात का जातो | Why we go to the temple

 आपण मंदिरात का जातो


आपण मंदिरात का जातो. आपली बरीच कारणे असतात त्यामुळे आपण मंदिरात जात असतो. आपल्याला मंदिरात गेल्यावर चांगले वाटते आपले मन शांत होते. घरांमध्ये बाहेर असताना ज्या विचारांचा आपल्याला त्रास होत असतो ते सर्व विचार मंदिरात गेल्यामुळे मनातून निघून जातात. मंदिरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा विचारतरंग असतात त्यामुळेच आपण मंदिरात गेल्यामुळे प्रसन्न होतो आनंदी होतो.

                      आपण मंदिरात गेल्यावर आपले दोन्ही हात जोडून प्रार्थना करतो आपण दोन्ही हात जोडतो कारण दोन्ही हात जोडल्यामुळे आपल्याला तसा भाव निर्माण होतोआपल्या मनामध्ये .आणि हेच महत्त्वाचे आहेअसा भाव निर्माण झाल्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटते मन शांत होते आणि याचाच परिणाम मंदिरामधील वातावरणामध्ये झालेला असतो.

                     आपल्याला कधी कधी मंदिरामध्ये जायला जमत नाही त्यामुळे आपण घरातून किंवा जिथे असून तेथूनच हात जोडून प्रार्थना करायला हवी कारण येथे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे मंदिरांमध्ये आपण हात जोडल्यामुळे आपला तसा भाव यायला सुरवात होते.होते त्यामुळे आपण जेथे असून तेथून जर हात जोडून नमस्कार केला तर तो ईश्वराला पोहोचतो कारण त्याचा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झालेला असतो.

                   मंदिरा मध्ये गेल्यावर जसा आपला भाव निर्माण होतो जर तसाच भाव आपण जर घरी हात जोडून आणायचा प्रयत्न केला तर हे शक्य आहे त्यामुळे आपले घरच मंदिर बनेल. आपले शरीर मंदिर बनेल. आपल्या वरच्या क्रिया पेक्षा आतील भाव फारच महत्त्वाचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अशा अनेक लीला आहेत ज्यामध्ये महाराज त्यांच्याकडे आलेल्या सर्व भक्तांचा नेहमी भाव काय आहे हे तपासत असत.

 धन्यवाद…!

Post a Comment

0 Comments