सुंदर विचार Good Thoughts

सुंदर विचार



🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹
*सामान्य मनुष्याला एकवेळ तत्वज्ञान समजायला कठीण जाईल पण त्याला प्रेम मात्र नक्की समजते. म्हणून समर्थ आपल्याला  चक्रवाक पक्षांच्या जोडप्याचे उदाहरण देऊन भक्त आणि भगवंत यातील नाते समजावून सांगत आहेत. चक्रवाक पक्षी दिवसभर एकत्र विहार करतात पण रात्रीच्या अंधारात ते वाट चुकतात. सूर्योदय झाल्यावर स्वाभाविकपणे त्यांची भेट होते, मिलन होते. त्यांच्यावर आलेले विरहाचे संकट (दुःख) भगवान सूर्यनारायण दूर करतात. समर्थ म्हणतात की भक्ताला संकटात पाहिले की सुर्याप्रमाणे भगवंत देखील स्वतःहून भक्ताला संकटातून सोडवतात. काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असतं, कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही. मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते.....!  देवाच्या न्यायालयात वकीली चालत नाही. जर शिक्षा झाली तर जामीन पण होत नाही. कारण तो नियमात चालतो. कोणतंही चुकीचं कृत्य तुम्ही केले मग ते अज्ञानाने करा, चुकुन करा, नकळत करा किवा जाणूजबुजून करा. केलेल्या चुकीच्या कर्माची शिक्षा होणार म्हणजे होणार. केलेल्या कर्माचं फळ देण्याचा अधिकार त्या नियंत्याचा आहे. कधी आणि केव्हा द्यावयाचे ते तो ठरवत असतो.*
🌹🌹🌹🌹🌹🔥🌹🌹🌹🌹🌹
🙏🙏 *श्रीदत्त* 🙏🙏




*देवाचा संदेश*

                    *मी  मंदिरात नाही.* माझ्या अभिषेकाला दूध आणू नका, दूध द्यायचे असेल तर  वस्तीतल्या एखाद्या तान्हुल्याला द्या, मी तिथेच भेटेन तुम्हाला, तुम्ही मंदिरात भेटायला येऊ नका. *कारण मी मंदिरात नाही*

                    तुम्हाला मला नैवेद्य द्यायचा असेल तर जरूर द्या, पण मंदिरात नाही, एखाद्या भुकेल्याला पोट भरून खाऊ घाला, मी तिथेच असेन तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. *कारण मी मंदिरात नाही*

                     तुम्हाला माझी सेवा करायची असेल तर जरूर करा,  मी आहे रस्त्यावर बसलेल्या रोग्यांमध्ये, मी तुम्हाला तिथेच भेटेन, *कारण मी मंदिरात नाही.*

                  मला कुठलेही वस्त्र देऊ नका, त्या वस्त्राचा वापर एखाद्या उघड्या माझ्या मुलाला द्या, मी तिथेच भेटेन तुम्हाला, *कारण मी कुठल्याही मंदिरात नाही.*

                 दिव्यांचा झगमट नक्कीच करा, पण मंदिरात नाही, मी आहे अंधकारात जगत असलेल्या माझ्या अंध मुलांमध्ये त्यांच्या आयुष्याला प्रकाश द्या, मी आहे तिथे तुम्हाला दुवा द्यायला. *कारण मी मंदिरात नाही.*

                     या मला भेटायला नक्की, पण पानं फुल घेऊन नको, मुक्या प्राण्यांना एक पेंडी चारा घेऊन या, तेव्हा माझे दर्शन होईल तुम्हाला.  *कारण मी मंदिरात नाही.*

                मला नमस्कार करायचा असेल तर नक्की करा, मी आहे तुमच्या कुटुंबातल्या वरिष्ठांमध्ये, त्या आई वडिलांना नमस्कार करा, मी तिथेच भेटेन तुम्हाला. *कारण मी मंदिरात नसतोच... कधीही* 
🙏🙏🙏🙏🙏🏻





💕🌱💕||नामप्रभात||💕🌱💕

एका माणसाची प्रकृती बरी होती पण त्याच्या पायामध्ये काहीतरी दोष उत्पन्न झाला. डॉक्टर म्हणाला की, 'जीव वाचवायचा असेल, तर पाय कापायला हवा.' आता, नुसता प्राण आहे पण हात हलत नाही, पाय हलत नाही, डोळयांनी दिसत नाही, कानांनी ऐकू येत नाही, पण प्राण आहे, तर उपयोग नाही. याउलट, बाकी सगळे आहे पण प्राण नाही, तरीही उपयोग नाही. प्राण आहे पण बाकीच्या गोष्टींपैकी एखादी नसली तर चालू शकेल. समजा, कानाने ऐकू येत नाही; नाही तर नाही ! कुठे बिघडले ? 
उपासना, अनुसंधान, हे प्राणासारखे समजावे; बाकी व्याप आहे तो शरीराच्या इंद्रियांप्रमाणे समजावा. *यात भगवंताचे अनुसंधान चुकले तर प्राणच गमावल्यासारखे आहे;* ते सांभाळून जे करता येईल तेवढेच करणे जरूर आहे. ते न सांभाळता बाकीच्या गोष्टी केल्या तर अंती निराशा आहे.




💕🌱💕||श्री स्वामी समर्थ||💕🌱💕

Post a Comment

0 Comments