प्रार्थना एक अद्भुत शक्ती
एका मोठ्या
झाडावर दोन पक्षी बसलेले असतात ते आपापसात आनंदाने गप्पा मारत बसलेले असतात. काही वेळाने
त्यांना असे लक्षात येते की कोणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. ते दोन्ही पक्षी लक्ष
देऊन पाहतात तर काय एक शिकारी बंदूक हातात घेऊन या पक्षावर प्रेम करत असतो. दोन्ही पक्षी
फार घाबरून जातात व लगेच एकमेकांना सांगतात की आपण येथून लगेच उठून जाऊया म्हणून सोडण्याच्या
तयारीत असतात तर वर आकाशाकडे बघतात तर काय आकाशात मोठी घार उडत असते. आणि ती सुद्धा
त्या दोन्ही पक्षावर नजर ठेवून असते की कधी हे छोटे पक्षी आकाशात उडतात आणि मी त्यांना
पकडते.
अशाप्रकारेत्या
दोन्ही पक्षांचे फार पंचाईत झालेली असतेइकडे आड आणि दुसरीकडे बीर दोन्ही बाजूने मरणच
दिसत असतील दोन्ही पक्षी एकमेकाकडे पाहून म्हणतात कि आता काय करायचे या संकटातून आपणाला
कोण वाचवणार त्यामधील एक पक्षी दुसऱ्या पक्षाला म्हणतो आपणाला आता एकच गोष्ट वाचवू
शकते ते म्हणजे प्रार्थना. आपण ईश्वराची प्रार्थना करूया लगेच दुसरा पक्ष म्हणतो याचा
आता काही उपयोग होणार नाही कारण कोणत्याही क्षणी शिकारी बंदूक चालू होईल आणि आपल्याला
गोरी मारले.
पहिला पक्षी म्हणतो आता दोन्ही बाजूने
मरणच आहेपण काहीच न करण्यापेक्षा एकदा प्रार्थना तर करून बघूया नाहीतर मरायचे तर आहेत
दुसऱ्या पक्षाला पहिल्या पक्षाचे म्हणणे पटते आणि मग दोन्ही पक्षी ईश्वराला प्रार्थना
करू लागतात. की आम्हाला या संकटातून वाचवा आणि आमचे रक्षण करा त्यांची प्रार्थना सुरू
असते. तेवढ्या तर त्यांना जोराचा गोळी झाडल्याचा आवाज येतो ते दोघे पक्षी घाबरून डोळे
उघडतात आणि पाहतात तर काय दोघे पण जिवंत आहेत दोघे पक्षी पाहतात तर काय शिकारीचे लक्ष
नाहिये आणि आकाशातील घार पण दिसत नाहीये हे बघून दोन्ही पक्षी ईश्वराचे आभार मानून
पटकन उडून जातात.
तर येथे काय झाले असते दोन्ही पक्षांची प्रार्थना ईश्वराने ऐकलेली
असते. जेव्हा शिकारी गोळी झाडण्याचा तयारीत असतो त्याच्या पायाला एक विंचू जोराने चावतो
त्यामुळे त्याचा नेम चुकुन तो आकाशात उडणाऱ्या घारीला लागतो आणि ती घार मरते.अशाप्रकारे ईश्वर
त्यांची प्रार्थना ऐकून त्यांचे रक्षण करतो. अशाप्रकारे आपण सुद्धा श्री स्वामी समर्थ
महाराजांची रोज प्रार्थना केली पाहिजे आणि संकटाच्या वेळी तर केलीच पाहिजे संकट कितीही
अंतिम क्षणापर्यंत आलेले असुदे कितीही अगदी आपल्या गळ्यापर्यंत आलेले असू दे आपण श्री
स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवून अगदी मनापासून महाराजांची प्रार्थना केली पाहिजे
महाराज आपल्या भक्तावर नेहमी कृपा करतात धन्यवाद.
0 Comments