भक्तीवीणा प्रचीती नाही आणि प्रचीती वीना भक्ती नाही. Shri Swami jai jai swami Samarth


भक्तीवीणा प्रचीती नाही आणि प्रचीती वीना भक्ती नाही.



जसजशी सेवा वाढते तशी आधिकाधिक प्रचीती येऊ लागते. महाराजांची तसबीर घरातील देवघरात स्थानबद्ध होते. नामस्मरण, परायण ह्यात मन रमू लागते. पण इतके सर्व होवूनही एक गोष्ट मात्र जात नाही ती मी पणा अध्यात्मात अहंकाराला स्थान नाही. अहंकाराचा वारा न लागो म्हणतात ते सार्थ आहे. मी पारायण केले, मी नामस्मरण केले ह्यामध्ये असलेला मी फार चालत असतो आणि तो आपल्यात आणि सद्गुरुंमध्ये दरी निर्माण करतो. त्यापेक्षा महाराजांनी मला नामस्मरणाची संधी दिली आणि मी कृतकृत्य झालो. 

महाराजांनी माझ्याकडून पारायण करून घेतले हा असा भाव आपण मनात ठेवला तर अहंकार मनास शिवणार सुध्दा नाही. आहो आपण कोण पारायण आणि नामस्मरण करणारे. मुळातच आपल्या आयुष्यात सद्गुरुंचे आगमन व्हायला आपले पुर्व प्रारब्ध लागते हे विसरून चालणार नाही. आध्यात्मिक प्रवास हा अत्यंत खडतर आहे. इथे पी हळद हो गौरी हा नियम लागू पडत  नाही. इथे लागतो तो संयम गोष्टी आपोआप घडत जातात  आपण आपल्या साधनेत तसूभरही चुकायचे नाही आणि काही मागायचे नाही. आपल्याला काय द्यायचे हे गुरुंना माहीत असते आणि वेळ आली कि ते आपल्याला दिल्या शिवाय रहात नाही.

अध्यात्मातील मार्ग खूप खडतर आहेच पण महाराज खूप परीक्षा पाहतात. अगदी टफ पेपर असतो त्यांचा पण एक दिवस नक्कीच पास होतो. काहींचा संमय सुटतो आणि मग त्यांनी आपली परीक्षा घ्यायची तर आपणच त्यांची परीक्षा घेतो. महाराज आपले पोरखेळ पाहत राहतात.

आपण उठसूट महाराजांना वेठीस धरतो... चार दिवस नाही झाले, २ माळा नाही ओढल्या तर किती गर्व होतो आपल्याला, आपल्यासारखा कुणी भक्तच नाही ह्या भावनेने दिमाखात वावरू लागतो. 

महाराजांवर हक्क ही गाजवू लागतो. पण महाराज आपल्यावर कधी रागवत नाहीत कारण ह्या सर्वातून तावून सुखावूनच आपण एक उत्तम भक्त होणार असतो.

त्यांच्या सर्व कसोट्यांवर खरे उतरलो कि महाराजांचे दर्शनही घडते आपल्याला महाराजांनी आपल्या भक्तांना अभिवचन दिले आहे जिथे स्वामीनाम आहे तिथे मी आहे. पण वर्षानुवर्ष आध्यात्मिक प्रवास करूनही एक प्रश्न स्वतःला  विचारला " आध्यात्मातील कुठल्या पायरीवर आहे मी ? तर त्याचे उत्तर आहे.

अजूनही पहिल्याच पायरीवर आहे मी...


                                            

Post a Comment

0 Comments