संकटनाशन स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने 12 Names of God Ganesh in Ganpati Stotra

 नारदकृत - *'संकटनाशन'* स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने..


आपण असंख्य वेळेला हे *"गणपती स्तोत्र"* *"संकटनाशन स्तोत्र"* म्हणतो परंतु यामध्ये उल्लेख केलेल्या गणेशाची प्रत्यक्ष स्थाने आपल्यापैकी

बहुतेकांना माहीत नाहीत....

 

*प्रथमं वक्रतुण्ड च* 

*एकदन्तं द्वितीयकम् ।* 

*तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं* 

*गजवक्त्रं चतुर्थकम्*

*लम्बोदरं पंचमं च* 

*षष्ठ विकटमेव च ।* 

*सप्तमं विघ्नराजेन्द्रं* 

*धूम्रवर्णं तथाष्टमम्*

*नवमं भालचन्द्रं च* 

*दशमं तु विनायकम् ।* 

*एकादशम् गणपति* 

*द्वादशं तु गजाननम्*

 

१. *वक्रतुण्ड* :- मद्रास राज्यातील कननूरजवळ

 

२. *एकदन्त* :- पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्याजवळ.

 

३. *कृष्णपिंगाक्ष* :- मद्रास राज्यातील कन्याकुमारीजवळ.

 

४. *गजवक्त्र* :- ओरिसा राज्यात भुवनेश्वर येथे.

 

५. *लंबोदर* :- ह्याची दोन स्थाने उल्लेखिली जातात. (१) रत्नागिरी

जिल्ह्यातील गणपती पुळे क्षेत्रात, (२) मध्यप्रदेशातील ओंकारेश्वर या प्रसिद्ध

ज्योतिर्लिंगाजवळ असलेला पंचमुखी गणपती.

 

६. *विकट* :- हिमालयाच्या पायथ्याशी हृषीकेश येथे.

 

७. *विघ्नराजेन्द्र* :- कुरु क्षेत्रात कौरव-पांढवांच्या युद्धभूमीजवळ.

 

८. *धूम्रवर्णं* :- १) दक्षिणेकडील केरळ राज्यात कालिकतजवळ. २) तिबेटमध्ये ल्हासापासून १५ मैलांवर.

 

९. *भालचंद्र* :- रामेश्वरजवळ धनुष्कोडी येथे मद्रास राज्य.



 १०. *विनायक* :- काशीक्षेत्रातील अन्नपूर्णामंदिराजवळचा धुण्डिराज गणेश.

 

११. *गणपती* :- क्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथील द्विभुज महागणपती.

 

१२. *गजानन* :- हिमालयातील शेवटचे तीर्थस्थान पांडुकेसर येथील मुंडकटा गणेश. गौरी कुंडाजवळील ही गणेशमूर्ती शिरविरहित आहे.

 

समर्थ रामदास स्वामींनी ही बाराही गणेशस्थाने शोधून काढून सर्व गणपतींचे दर्शन घेतले होते, असे म्हणतात

 

*।। जय श्री गणेश ।।*

 

Post a Comment

0 Comments