Akkalkot swami samarth tarak mantra

अक्कलकोटस्वामी समर्थ तारकमंत्र


 निःशंक हो, निर्भय हो, मनारे प्रचंड स्वामीबल पाठिशी रे  

अतर्क्य अवधूत हे स्मर्तु गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥ 

जिथे स्वामीपाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय 

आज्ञेविना काल ना नेई त्याला परलोकिही ना भीती तयाला ॥ २ ॥ 

उगाचि भीतोसि, भय हे पळू दे जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे 

जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्याचा नको घाबरू तू असे बाल त्यांचा ॥ ३ ॥

 खरा होई जागा तू श्रद्धेसहीत कसा होशी त्यावीण तू स्वामिभक्त 

कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ ॥ ४ ॥

 विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात

 हे तीर्थ घे,घेआठवी रे प्रचीती न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ॥ ५ ॥

 ॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥

Post a Comment

0 Comments