मी नेहमी आनंदी असतो Shree Swami Samarth

 म्हणून मी नेहमी आनंदी असतो


मी भुतकाळ चघळत बसत नाही, ना मी उद्याच्या भविष्याची चिंता करतो, मी फक्त वर्तमानात असेल तसा निस्वार्थपणे आहे त्यात आनंद माणुन जगतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


मी कुणाकडुनच काडीचीही अपेक्षा केलेली नाही व करत ही नाही, मी कुणाही बद्दल कधीच राग, रोष, कपट व द्वेष मनात धरत नाही, मी लगेच सगळ्यांना माफ करतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


मी हायफाय राहण्यासाठी धडपडत नाही, नात्याची, आपुलकीची आणि मैत्रीची किंम्मत नसणाऱ्यांसाठी कधीच दुःखाने तडफडत नाही, साधं राहुन आपल्या माणसांत सुखानं रमतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


कोण काय बोलतं ह्याचा मी कधीच विचार करत नाही. कोणी काहीही बोललं तरी पुन्हा मी ते स्मरत नाही. माझे जीवन स्वछंदी आहे, ते मी मजेत जगतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


मला ना पैशाचा, ना पदाचा, ना ज्ञानाचा, अहंकार ना कधी मला दुसऱ्याबद्दल तुच्छतेचा विचार कधी माझ्या मनालाही भावला नाही . पाय नेहमी जमिनीवरच ठेऊन प्रसंगी मी अनवाणी चालत असतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


जगायला काहीच भौतिक सुख लागत नाही, म्हणून मी गर्वाने कधीच वागत नाही, सगळ्यांशी प्रेमाने आदराने आपुलकीने वागतो. हे विश्वची माझे घर आहे अस मानतो..म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth


जन्म शाश्वत आहे तसा मृत्यू देखील शाश्वत आहे, ही जाणीव आहे. माझ्यातही दोष आहेत आणि काहीतरी नक्कीच उणीव आहे. माझे दोष मी रोजच पाहुन सुधारण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी नेहमी आनंदी असतो.  Shree Swami Samarth

भारतीय अध्यात्म Indian Spiritual

आयुष्य बदलण्यासाठी वेळ सर्वांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य पुन्हा मिळत नाही. आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. आपण सर्वानी आनंदात राहूयात. मी सर्व लोकांच्यावर प्रेम करत असतो, म्हणून मी नेहमी आनंदात असतो..  Shree Swami Samarth


हा देश माझा आहे, हा समाज माझा आहे. आज मी जो कोणी आहे तो या देशामुळे आहे समाजा मुळे आहे याची मला जाणीव आहे. आपण समाजाचं काही तरी देणं लागतो.. ते देणं मी नेहमी देत असतो, आणि म्हणून तर मी नेहमीच आनंदी असतो...  Shree Swami Samarth

Post a Comment

0 Comments