✅ कैलास मंदिराची अद्भुत गोष्ट 🔱 | Kailasa Temple Ellora | Maharashtra Heritage | हर हर महादेव 🚩

 मी आज तुम्हाला कैलास मंदिराची सविस्तर माहिती देणार आहे. याची वैशिष्ट्ये फारच आश्चर्य जनक आहेत कैलास मंदिर, एलोरा हे ठिकाण एलोरा, औरंगाबाद, महाराष्ट्र यथे वसलेले आहे. येथील प्रमुख देवता भगवान शंकर म्हणजे कैलासनाथ हे आहेत. 



आता आपण याचा इतिहास व निर्मिती काशी झाली ते पाहूया

कैलास मंदिर हे एलोरा लेणीतील १६वे लेणं असून, याची निर्मिती इ.स. ७५६ ते ७७३ या दरम्यान राष्ट्रकूट राजवंशातील कृष्णराज पहिला याने केली. हे मंदिर भगवान शंकराच्या कैलास पर्वताच्या निवासस्थानावर आधारित आहे.

याची वैशिष्ट्ये फारच आश्चर्य जनक आहेत. हे संपूर्ण मंदिर एका मोठ्या दगडातून कोरलेले आहे, ज्याला “रॉक कट आर्किटेक्चर” म्हणतात. मंदिरावर सुंदर शिल्पकला, मूर्ती आणि नक्षीकाम दिसते. त्यावर रामायण, महाभारत, पुराणातील प्रसंग कोरलेले आहेत. याचे आकारमान असे आहे की  मंदिराची उंची सुमारे ३० मीटर, लांबी ८५ मीटर आणि रुंदी ५४ मीटर आहे.  मंदिराची निर्मिती वरपासून खाली दगड खोदत करण्यात आली आहे. सुमारे ४ लाख टन दगड काढण्यात आला असे सांगितले जाते. पण हे दगड मंदिराच्या जवळ किवा दूरवर कुठेच पडेले दिसत नाहीत. हे फारच मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. काहीजण असेही म्हणतात की हे मंदिर eliyance बांधले आहे. मंदिराच्या काही फार मोठे शहर सुद्धा निर्माण केलेले आहे असे सुद्धा म्हणले जाते पण याचे काही पुरावे आपल्या जवळ उपलब्ध नाहीत. 

ह्या ठिकाणाची  मुख्य आकर्षणे अशी आहेत की 

नंदी मंडप म्हणजेच शिवाचे वाहन

मुख्य गाभारा म्हणजे शिवलिंग असलेला

मंदिराची शिखरे

दोन मोठे हत्तींच्या मूर्ती

दशावतार व इतर पुराणकथा कोरलेली शिल्पे

ह्या मंदिराचे महत्त्व असे आहे की,

कैलास मंदिर हे जागतिक वारसा स्थळ UNESCO World Heritage Site असलेल्या एलोरा लेणींचा भाग आहे. हे मंदिर केवळ धार्मिकच नाही, तर स्थापत्यकलेचं अद्भुत उदाहरण मानलं जातं.

आता आपण बघूया की या ठिकाणी आपण कसे पोहोचावे. मंदिरापसून सर्वात जवळचे शहर: औरंगाबाद हे आहे अंतर ३० किमी आहे. रेल्वे स्थानक आणि विमानतळ  हे औरंगाबाद येथे आहे याचा आपण उपयोग करू सकतो. विमानतळ सुद्धा  औरंगाबाद आहे. औरंगाबादहून एलोरा लेणींसाठी नियमित बस/टॅक्सी सेवा उपलब्ध किंवा आपण रिक्शा सुद्धह वापरू सकतो. 

कैलास मंदिराची अद्भुत कथा अशी सांगितली जाते की 


खूप वर्षांपूर्वी, राष्ट्रकूट राजवंशात एक पराक्रमी राजा होऊन गेला — कृष्णराज पहिला. त्याला भगवान शंकराची अपार भक्ती होती. एक दिवस त्याने ठरवलं की आपल्या साम्राज्यात असं मंदिर बांधायचं, जे केवळ भव्यच नसेल, तर शिवशक्तीचं प्रतीक ठरेल.

राजाने आपल्या राजकारागीरांना बोलावलं आणि आज्ञा दिली, “मला कैलास पर्वतावरचं मंदिर इथे पाहिजे — जिथे माझा प्रभू राहतो!”

सर्वांनी डोंगर निवडला, आणि काम सुरु झालं. पण ही काही साधी कामगिरी नव्हती!

संपूर्ण डोंगरावरून मंदिर कोरण्याचं काम होतं — वरून खाली.

हजारो कारागीर, शिल्पकार, आणि मजूर दिवस-रात्र कष्ट करू लागले. एकेक दगड कोरत, एकेक मूर्ती तयार करत, त्यांनी डोंगराला जीवन दिलं. काहीजण म्हणतात की या कामाला १८ वर्षं लागली, काही आख्यायिका सांगतात की काम पूर्ण करण्यासाठी कामगारांनी देवीला नवस केला होता!

हत्तींच्या मूर्ती, नंदी मंडप, शिवलिंग, रामायण-महाभारतातील शिल्पं, शिखरे — हे सगळं पाहून लोक विस्मयचकित व्हायचे.

शेवटी, जेव्हा मंदिर पूर्ण झालं, राजा कृष्णराज पहिला मंदिराच्या पायरीवर उभा राहून म्हणाला,

“हे केवळ माझं नाही, हे माझ्या कारागीरांचं, माझ्या जनतेचं, आणि सर्वात महत्त्वाचं — माझ्या भगवान शंकराचं आहे!”

आजही, एलोरा येथील कैलास मंदिर पाहताना आपल्याला त्या हजारो हातांचा, त्या अद्भुत भक्तीचा आणि त्यागाचा सुगंध जाणवतो.



येथे प्रवेश शुल्क व वेळ असे आहे की भारतीय पर्यटक साठी  ₹४० आणि परदेशी पर्यटक साठी ₹६०० असे आहे. वेळ ही  सकाळी ६:०० ते सायंकाळी ६:०० अशी आहे आणि माझ्या माहितीनुसार हे मंगळवार बंद असते तरीसुद्धा आपण एकदा ऑनलाइन चेक करून जावे.


आजचा हा कैलास मंदिराचा विडियो आपणाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. कृपया लाइक, शेअर आणि subscribe करा . धन्यवाद.


Post a Comment

0 Comments