गरबा,Garba,Dandiya,

 

गरबा



गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो. Garba,Dandiya

हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे Garba,Dandiya

महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात. Garba,Dandiya

गुजरातमधील पारंपरिक धार्मिक आशय असलेले गरबा नृत्य १९८० सालाच्या आसपास सार्वजनिक रूपात केले जाऊ लागले. त्यापुरी मेवाड मधील विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र काळात हे नृत्य केले जात असे. तरुणाईला आकर्षण वाटावे यासाठी या नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले. पारंपरिक देवी गीतांच्या जोडीने आधुनिक गीते गायली जाऊ लागली आणि त्या तालावर गरबा नृत्य केले जाऊ लागले. दांडिया घेऊन नृत्य करणे हे गरबा नृत्याचे आधुनिक व्यावसायिक रूप आहे. Garba,Dandiya

गरबा हा कलाप्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराथी आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात विशेष आनंद घेतात. Garba,Dandiya

गरबा खेळणे म्हणजे काय ?

 गरबा खेळणे यालाच हिंदु धर्मात टाळयांच्या लयबद्ध गजरात देवीचे भक्‍तीरसपूर्ण गुणगानात्मक भजन करणे, असे म्हणतात. गरबा खेळणे, म्हणजे टाळयांच्या माध्यमातून श्री दुर्गादेवीला ध्यानातून जागृत करून तिला ब्रह्मांडासाठी कार्य करण्यासाठी मारक रूप घेण्यास आवाहन करणे. टाळीच्या आघातातून तेजाची निर्मिती होते. त्यामुळे देवीच्या मारक रूपाला जागृत करणे शक्य होते. तसेच टाळया वाजवून गोलाकार फेर धरून देवीला आवाहन करणारी भक्‍तीयुक्‍त भजने म्हटल्याने देवीप्रति भाव जागृत होण्यास मदत होते. गरब्याच्या वेळी गोलाकार फेर धरून केलेले मंडल हे घटाचे प्रतीक असते. Garba,Dandiya

'महाराष्ट्रात ज्या पद्धतीने नवरात्रौत्सव साजरा केला जातो त्याच्याशी काही प्रमाणात साधर्म्य साधणारा असला, तरी गुजरातमधील नवरात्रीत वेगळेपण पाहायला मिळते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुजरातमध्येही बहुतांश घरात घटस्थापना केली जाते. मातीचा एक घड (ज्याला अनेक छिद्रे आहेत) ठेवून त्यामध्ये चांदीचा शिक्का आणि दिवा ठेवतात. त्याची पूजा करून नऊ दिवस या दिव्याची पूजा करून त्याला अखंड तेवत ठेवण्याची तिथे परंपरा आहे. या घडाला गुजरातीमध्ये 'गरबी' म्हणतात. याच गरबीच्या पूजनावेळी जे पारंपरिक नृत्य केले जाते, त्याला 'गरबा' असे नाव पडले आहे. गुजरातमध्ये नवरात्रीचे तीन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिले तीन दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते. पुढील तीन दिवस लक्ष्मीची आणि त्यानंतर सरस्वती देवीची पूजा घातली जाते. महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही अष्टमीच्या दिवशी केल्या जाणाऱ्या होमाला मोठे महत्त्व आहे. नवमीच्या दिवशी नऊ दिवसांपासून अखंड तेवत असलेल्या दिव्याचे आणि गरबीला जवळच्या मंदिरात ठेवून त्याचे विसर्जन करण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी गुजरातमध्ये प्रसिद्ध असलेले 'जिलेबी' आणि 'फाफडा' हे पदार्थ आणून विजयादशमी साजरी केली जाते. Garba,Dandiya

जगभरात गुजरात ज्यासाठी प्रसिद्ध आहे ती कला म्हणजे गरबा आणि दांडिया. नऊ दिवस गुजरात मधील तरुण-तरूणी रात्रभर गरबा दांडियाचा खेळ खेळतात. नऊ दिवस ठरलेल्या विशिष्ट रंगांचे वेश धारण करून ही मंडळी शेकडोंच्या संख्येने गुजराती गाण्यांवर फेर धरतात. त्यांनी धारण केलेल्या पारंपारिक वेशाला 'केडीयू' असे म्हणतात. पहिल्या दिवशी निळा रंग मग अनुक्रमे पिवळा, हिरवा, करडा, पांढरा, लाल, आकाशी, गुलाबी, असे वर्षानुवर्षे ठरलेल्या रंगांचे वेश धारण करून गुजरात नऊ दिवस विविध रंगांनी न्हाऊन निघतो. आदिशक्तीची आराधना करताना नऊ दिवस अहोरात्र जागणारा हा उत्सव भारताच्या बहुरंगी संस्कृतीचे उत्तम उदाहरण आहे. Garba,Dandiya


Post a Comment

0 Comments