श्री दत्त भक्त कोण ? Dattatreya,Datta

 श्री दत्त भक्त कोण ?  Dattatreya,Datta


दत्त भक्त -- याची व्याख्या म्हणजे ज्याला उद्धरून नेण्याचे महाराजांनी ठरवले तो दत्त भक्त . ज्याच्या मुखी आपले नाम घेण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,लीला स्मरण्याची आणि त्या सांगण्याची वाचारुपी प्रेरणा दिली तो दत्त भक्त . या लीला माहीत असोत व नसोत त्या ऐकण्याची बुद्धी दिली तो दत्त भक्त ,ज्याला आपल्या पायांचा उपयोग नृसिहवाडी सारख्या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी करावा असे वाटते  तो दत्त भक्त . महाराजांच्या समोर दोन हातांचा वापर करत नमस्कार करण्याची ज्याला प्रेरणा  मिळते तो दत्त भक्त . थोडक्यात आपल्या शरीर ,मन ( बुद्धी ) आणि वेळेचा उपयोग जो दत्त महाराजांच्या भक्तीकरता करतो तो दत्त भक्त. Dattatreya,Datta


पण मग या दत्त भक्तीचे स्वरूप अत्यंत मर्यादित का आणि कसे ? तर हि दत्त भक्ती फार दुर्लभ आहे . सर्वाना महाराजांनी ती संधी दिलेली नाही . दत्त माहात्म्यातील सात गाथा सांगताना स्वतः दत्त महाराज विष्णुदत्त ब्राह्मणाला म्हणतात ,माझी भक्ती दुर्लभ जाण l ती तुला मिळाली दैवेंकरून ll (द मा ९/१०५) हि दुर्लभ अशी दत्त भक्ती आपल्या वाट्याला आली असताना सहजसाध्य  मात्र अजिबात नाही . या मार्गात पापरूपी सर्प फुत्कार सोडत आहेत ,प्रलोभनांचे भोवरे गिळू पाहत आहेत ,निद्रा आणि आळस या तमोगुण प्रवृत्ती कायम सोबत करत आहेत ,नाना संकटे मध्येच आपल्याला गळाभेट देत आहेत. Dattatreya,Datta

या सर्वाना चुकवत दत्त महाराजांचे नामस्मरण करणे सोपे नाही . पण त्यांची कृपा झाल्यावर कठीण देखील नाही आणि म्हणून दिवसातून एकदा तरी त्यांची होणारी आठवण हि मनाला दिलासा देणारी आहे . हि आठवण म्हणजेच त्यांना आपला विसर पडलेला नाही याचे सूचक आहे . अनेकदा आपल्या हातून काही होत नाही याची खंत मनाला वाटू न देता अनेक पायऱ्या ओलांडत महाराजांनी आपल्याला जवळ केले आहे हे विसरू नका . आधीच मनुष्य जन्म दुर्लभ त्यातही तो भारत वर्षात त्यातही इथे या राज्यात त्यातही महाराजांच्या सेवेत आपण आहोत . अल्प स्वल्प का होईना होत राहणे महत्वाचे आहे . किती होत आहे पेक्षा काहीतरी होत राहणे आणि ते हि नित्य हे मोलाचे आहे . तेव्हा या दत्त भक्त असल्याचा अभिमान बाळगत नित्य म्हणत रहा. Dattatreya,Datta

                                                        श्रीगुरुदेव दत्त

Post a Comment

0 Comments