दत्तमहाराजांची सेवा
बऱ्याच जणांना हा प्रश्न असतो की आपण दत्तमहाराजांची जी काही सेवा अथवा भक्ती करत आहोत ती योग्य दिशेने करतो आहोत की नाही याचे प्रमाण काय? Datta, Gurucharitra
आपण दत्तभक्तीत जर खरोखर मार्गक्रमण करीत असु तर खालील काही लक्षणे आपण योग्य मार्गाने जात आहोत याची शाश्वती देऊ शकतात. Dattatreya, Gurucharitra
१) दत्तप्रभूंवर अकारण प्रेम दाटून येणे. Dattatreya, Gurucharitra
२) जेव्हा तुम्हाला नातेवाईकांपेक्षा दत्तभक्त जास्त जवळचे वाटू लागतात. त्यांच्या सहवासात अधिक अधिक काळ जावा अशी इच्छा होत राहते. Dattatreya, Datta
३) एखादा अपरिचित दत्तभक्त भेटला तरिही चर्चेतून आपली अनेक वर्षांपासून ओळख आहे असा भास होणे. Dattatreya, Gurucharitra
४) दत्तभजने ऐकताना किंवा म्हणताना अश्रू दाटून येणे व ओक्साबोक्शी रडावेसे वाटणे अथवा रडणे. Dattatreya, Datta
५) महाराजांच्या कुठल्याही तिर्थक्षेत्री गेल्यावर (गिरनार, नृसिंहवाडी, गाणगापूर, कुरवपूर, पिठापुर, अक्कलकोट, कारंजा इत्यादी) तिथे काय वाचू, कोणते पारायण करू असा सारखा प्रश्न पडणे, मिळालेला वेळ कमीच वाटणे, तेथील पादुकांवरून काहि केल्या नजर विचलित न होणे. Dattatreya, Gurucharitra
६) परिचित अथवा अपरिचित दत्तभक्त भेटल्यावर आनंदाच्या उर्मी उठणे. त्यांच्याबरोबर दीर्घकाळ महाराजांच्या बद्दल चर्चा करावी, त्यांचे अनुभव जाणून घ्यावे किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकावे अशी इच्छा होत राहणे. Dattatreya, Datta
७) कोणत्याही दत्तभक्ताशी बोलताना चर्चेचा विषय फक्त आणि फक्त दत्तप्रभूंच्या लीलांचे वर्णन करण्यात अथवा त्यांच्या आठवणीत घुटमळत राहिल्याची जाणीव होणे. Dattatreya, Datta
८) थोरले स्वामी महाराज म्हणजेच प पु श्री टेम्बे स्वामी महाराजांच्या साहित्य स्तोत्रसंग्रहाची पारायणे होणे. Dattatreya, Datta
१०) दत्त दर्शन घेताना वारंवार श्री टेम्बे स्वामी महाराजांची आठवण होणे, त्यांनी रचलेली स्तोत्रे , पदे आपोआप मुखातून नकळतपणे बाहेर पडणे. Dattatreya, Datta
१०) गुरुचरित्राची पारायणे करण्यातच आपले जीवन एकांतात व्यतीत करावे अशी मनोवृत्ती तयार होणे. कितीही पारायणे झाली तरी आपली साधना कमीच पडते आहे असे मनातून वाटणे. Dattatreya, Gurucharitra
११) कोणी आपल्याला चांगले म्हणो अथवा वाईट, याची तमा न बाळगता दत्तभक्तीत दृढपणे वाटचाल सुरूच ठेवणारा तो दत्तभक्त. Dattatreya, Datta
१२) संकटांचे पहाड कोसळले तरिही दत्तभक्तीत निष्ठेने वाटचाल करणारा तो दत्तभक्त. Dattatreya, Datta
१३) दत्तभक्ती करण्यातच जीवन व्यतीत करावेसे वाटणे, तसेच महाराजांनी आपल्याला दत्तभक्तीत आणल्याबद्दल
वारंवार त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे. त्यांच्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न होणे. Dattatreya, Datta
१४) दत्तप्रभू तसेच दत्तभक्तांसमोर पैसा संपत्ती तुच्छ असल्याची जाणीव होणे. Dattatreya, Datta
१५) दत्तभजनात /नामात रंगून जाणे, त्यामुळे काळ आणि वेळेचे भान न राहणे, भजन संपूच नये असे वाटणे म्हणजेच महाराजांनी तुम्हाला त्यांच्या छत्राखाली घेतले आहे हे नक्कीच. Dattatreya, Datta
१६) महाराजांच्या चरणावर स्वतःला झोकून देऊन अश्रूंनी त्यांचे चरण धुऊन काढावेसे वाटणे.
१७) अहंकार गळून पडणे. वृत्तीत पालट होऊन लीनता येणे. Dattatreya, Datta
१८) दत्तगुरूंच्या प्रत्यक्ष दर्शनाची अत्यंतिक ओढ वाटणे. Datta, Shri gurudev datta
१९) भरपूर दानधर्म आणि अन्नदान करण्याची वृत्ती होणे. Dattatreya, Datta
२०) हिमालयीन बर्फाच्छादित शिखरे बघितल्या वर मनात विरक्ती उत्पन्न होणे.
२१) सतत साधू आणि संत सहवासात वेळ घालवण्याची इच्छा होणे. Dattatreya, Datta
२२) सत्संगात मन रमणे. त्याचे सतत चिंतन घडणे. Datta, Shri gurudev datta
२३) सद्गुरुंच्या / दत्त महाराजांच्या मानसपूजेत मन रममाण होणे. Dattatreya, Datta
२४) दत्तसंप्रदायातील सर्वच संत / सिद्धांबद्दल आणि त्यांच्या साहित्यावर आणि वचनांवर अपार आदर भावना जागृत होणे. Dattatreya, Datta
दत्तभक्तीत वाटचाल करताना वरील काही सर्वसाधारण लक्षणे अथवा खुणा आपण आपल्या वैयक्तिक जीवनात अनुभवू शकतो. अर्थात भक्ती ही संज्ञा या सर्वांच्या कितीतरी पुढे आहे. म्हणून वरील लक्षणे सुद्धा अपूर्णच आहेत हे नक्की. Datta, Shri gurudev datta
बहुदा वरील सर्व अथवा काही लक्षणे आपण दत्तभक्तीत मार्गक्रमण करीत असल्याची थोडीफार प्रचिती देऊ शकतात. Dattatreya, Datta, Datta, Shri gurudev Gurucharitra
धन्यवाद.
0 Comments