अभिषेक शास्त्रार्थ काय आहे, Shri swami samarth, Swami samarth abhishek

|| श्री स्वामी समर्थ ||


अभिषेक शास्त्रार्थ काय आहे ?

अभिषेकासाठी अभिषेक पात्र, शंख, गव्याचे शिंग, इत्यादी वस्तूंचा वापर करण्यामागे शास्त्रसंकेत कोणते ? जल, दूध, इक्षूरस (उसाचा रस) इत्यादी द्रवपदार्थांचे अभिषेक केव्हा केव्हा केले जातात ? Shri swami samarth, Swami samarth abhishek


           अभिषेक याचा अर्थ एखाद्या मूर्तीवर जल, दुग्ध, रस, तैल इत्यादी पातळ वस्तू सतत सिंचन करीत रहाणे. मंत्रघोष होत असतांना निर्माण होणाऱ्या स्पंदनांमुळे अभिमंत्रीत झालेले पाणी मूर्तीवर पडत राहील्याने मूर्तीमधील देवत्व अधिकाधिक जागृत होऊन इच्छित फलसिध्दीस कारणीभूत ठरते. अभिषेक पात्र हे अभिषेकासाठी वापरण्यात येणारे एक यंत्र आहे. यात्रिकतेमुळे नेहमीच फलसिध्दी लांबणीवर पडते, असा अनुभव आहे. कारण यांत्रिकता हा जडतेचा गुणधर्म आहे. म्हणून खऱ्या अर्थाने प्रभावी अभिषेक व्हावयाचा असेल, तर अभिषेक पात्र अडणीवर ठेवून किंवा कडीस टांगून गळती ठेवण्यापेक्षा पूजाकर्त्याने एकाग्र चित्ताने आपल्या हाताने उपकरणाच्या साह्याने अभिषेक करावा.  Shri swami samarth, Swami samarth abhishek

                गव्याचे शिंग शिवासाठी, उजवा (किंवा डावा) शंख (किंवा शंखिनी) विष्णुसाठी, तांब्याचे पात्र गणपती, सूर्य व देविसाठी वापरून अभिषेक करावा. शिंग व शंख कधीही पात्रात बुडवू नयेत. उजव्या हातात शिंग किंवा शंख धरावा व डाव्या हाताने त्यात पाणी भरत रहावे. बराच काळ अभिषेक चालणार असेल, तर नाईलाजाने अभिषेक पात्राचा उपयोग करावा. Shri swami samarth, Swami samarth abhishek

              दूध वा तेलाचा अभिषेक करताना शंख, शिंग व तांब्याचे भांडे वापरू नये, तर काशाचे, पितळेचे, चांदीचे भांडे वापरावे. रसाचा अभिषेक करताना न कळकणारे पात्र वापरावे. सूर्यकांत व देवीला पाण्याचा, विष्णू व गणपतीला दुधाचा, शिवाला उसाच्या रसाचा व शनीला तेलाचा अभिषेक विशेष प्रिय असतो.  Shri swami samarth, Swami samarth abhishek

            सर्व देवांना पाण्याचा अभिषेक चालतो. पाण्याखेरीज इतर द्रव पदार्थांना शंखे, शिंगे, अभिषेक पात्र शक्यतो वापरू नये. अभिषेकाच्या पूर्वी दूध, दही, तूप, मध व साखर या पंचामृताचा अभिषेक झाल्यावर.आंबा, केळी इत्यादी फळांचा रस घालावा.   Shri swami samarth, Swami samarth abhishek

           शेवटी सर्व पदार्थांनी मर्दन केल्यावर देव स्वच्छ धुवून शुध्द जलाचा अभिषेक करावा. अभिषेक पूर्ण झाल्यावर अत्तर लावून उष्णोदक घालावे. उष्णोदक घातल्यावर पुन्हा थंड पाणी घालू नये. देव पुसून झाल्यावर काहीजण मूर्तीच्या चेहऱ्यास अत्तराचे लेपन करतात. त्यानंतर उरलेले उपचार अर्पण करावेत. Shri swami samarth, Swami samarth abhishek



Post a Comment

0 Comments