॥ दत्त अवतारांचे महत्व || Shree Gurudev Datta

 ॥ दत्त अवतारांचे महत्व ॥


एकदा एक संत देवाबरोबर बोलत होता…..त्याने देवाला स्वर्ग आणि नरक मधला फरक विचारला…… “ये तुला प्रत्यक्ष दाखवतो….” देव म्हणाला… त्याने संताला दोन दरवाजांजवळ नेलं….त्याने पहिला दरवाजा ढकलला…..एका मोठ्या खोलीत प्रवेश केला….एका मोठ्या गोल टेबलाभोवती अनेक माणसे बसली होती….टेबलाच्या मध्यावर रुचकर खिरीने भरलेले मोठे भांडे ठेवलेलं होतं…..त्या खिरीच्या सुगंधाने त्या संत माणसाच्या तोंडाला देखील पाणी सुटलं होतं…..पण मग त्याच्या लक्षात आलं की ती माणसे उपाशी, भुकेलेली दिसत होती…..त्यांच्या हाताला लांब दांड्यांचे चमचे बांधलेले होते…..त्यांना हात लांब करून खीर खाता येत नव्हती…….कारण चमच्याचा दांडा हातापेक्षा लांब होता…..त्यांच्या यातनांना अंत नव्हता…..भुकेच्या भरीला खिरीच्या सुवासाने त्यांना वेड लावले होते…. “हा नरक आहे…” देव म्हणाला….  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


“चल आता स्वर्ग पाहू….” ते दुस-या दारातून आत आले….ती खोली सुद्धा हुबेहूब पहिल्या खोली सारखीच होती….तेच टेबल तेच खिरीचं भांडं…..भोवताली माणसं आणि हाताला बांधलेले चमचे…..पण ही सगळी माणसे तृप्त…समाधानी व आनंदी दिसत होती……आपापसात हसत आनंदाने राहत होती….. “मला कळत नाहीये…..” संत म्हणाला,” सारख्याच खोल्या, टेबल, भांडी, खीर आणि तेच लांब दांड्यांचे चमचे, मग ही माणसे खाऊन तृप्त आणि ती उपाशी आणि दु:खी का…?? “सोपं आहे…” देव म्हणाला “ या खोलीतील माणसे एकमेकांना भरवायला शिकली आहेत, एकमेकांना मदत करायला शिकली आहेत….पण हावरट मनुष्य फक्त स्वत:चा विचार करतो…..जस त्या खोलीत आहे जो तो स्वतःचा विचार करतो आणि उपाशी राहतो ” जेव्हा तुम्ही दुस-याची स्वप्न पूर्ण करायला मदत कराल तेव्हा आपोआपच तुमची स्वप्ने सुद्धा पूर्ण होतील……स्वत:च्या गरजांपेक्षा इतरांच्या इच्छा व आवश्यकतांना अधिक मान किंवा प्राधान्यक्रम देणे हे समूह यशाचे गुपित आहे….. यात आनंदाची बातमी अशी की हा स्वर्ग किंवा नरक निर्माण करणे आपल्याच हातात असते….खोली, खीर, टेबल आणि चमचा……. सगळ्यांना समान संधी मिळते….सर्वांना मदत करा……मग बघा आपल्या जीवनातील अंतरंग कसे खुलतात ते……आनंदी राहा दत्त महाराजांचे गुरु श्री दत्त महाराजांनी २४ गुरु केले. त्यांनी प्रत्येका कडुन एक एक गुण घेतला आणि त्यांना गुरु केलं. एकदा दत्त महाराज एका गावातुन जात होते. रस्त्याच्या कडेला एक लोहार लोखंड गरम करुन त्यावर घाव घालत काहीतरी बनवत होता. तो लोहार त्याच्या कामा मध्ये मग्न होता. एवढ्यात तिथुन त्या राज्यातल्या राजाची सवारी आली. राजा म्हणाला म्हणजे त्याचा लवाजमा मोठा म्हणायचा. त्याच्या सवारी बरोबर ढोल – ताशे वाजत होते. ती सवारी हळु हळु तिथुन गेली. तो लोहार मात्र त्याच्याच कामात मग्न होता. थोड्या वेळाने एक शिपाई मागुन आला. त्याने लोहाराला विचारले, ‘अरे! राजाची सवारी इथुन गेली का?’ लोहार म्हणाला, ‘मला माहित नाही बाबा. मी माझं काम करत आहे.’ शिपाई चिडला आणि त्याच्यावर ओरडत निघुन गेला की काय राजाची सवारी जाते आणि याला कळत सुध्दा नाही, हा याच्या कामात काय खरच इतका मग्न होता’. श्री दत्त महाराजांनी ते बघितले आणि तिथेच त्या लोहाराला आपला गुरु मानत म्हणाले, ‘धन्य आहे तुझी एकाग्रता! मी सेवा करत असतांना किंवा काम करत असतांना मलाही अशीच एकाग्रता लाभु दे!”  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


तात्पर्यः-  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


१. माणसाने प्रत्येका कडुन काही ना काही तरी शिकत राहावं.


२. कुठलं ही काम करत असतांना ते एकाग्रतेने करावं. दत्तावताराची प्रमुख वैशिष्ट्ये


१) साधुंचे संरक्षण,दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापनेसाठी सध्दर्माचे आचरण हे दत्तावताराचे प्रमुख वैशिष्य होय! इतर अवताराप्रमाणे हेतू सफल होताच निजधामास जाणारा हा अवतार नसून तो जगाच्या अंतापर्यँत असाच चालू राहणार आहे.


२) ब्रम्हदेवाचा पुत्र अत्रि व त्याच्या कठोर तपश्चर्येचे फळ म्हणून दत्ताचा अवतार झाला आणि म्हणूनच तो अयोनीसंभव मानला जातो.


३) या अवतारात ब्रम्हा,विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे व त्यांच्या परंपरांचे ऐक्य आहे.सृष्टीची उत्पत्ती,स्थिती व लय यासाठी प्रसिध्द असलेल्या या तीन देवांचे एकरुपत्व म्हणजे हा दत्तप्रभूंचा अवतार होय.


४) दत्तावतार हे ब्राम्हण कुलातील असून सती अनसूयेच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने या अवतारास महत्व आहे.


५) राम.कृष्ण इ. अवतार हे गृहस्थाश्रमी होते तर दत्तावतार हा फारच अल्पकाळ गृहस्थाश्रमात राहून नंतर अवधूत अवस्थेतच भ्रमण करणारा आहे.


६) हा अवतार म्हणजे साक्षात परब्रम्हमूर्ती श्री सद्गुरुंचाच अवतार होय.आणि म्हणूनच साधक ” श्रीगुरुदेवदत्त ” असा यांच्या नावाचा जयघोष करतात.


७) श्रीदत्त हे केवळ गुरुदेव नसून ते ” अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त ” या स्वरुपात आहेत.  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


८) श्रीदत्तात्रेयांनी आपल्या भक्तांना विविध वेषात व स्वरुपात म्हणजेच अवधूत, फकीर,मलंग,वाघ इ.दर्शने दिली आहेत.


९) दत्तावतार हा प्रामुख्याने वर्णाश्रम पध्दतीचा पुरस्कार करणारा असला तरी इतर जाती जमातींना त्याच्या उपासनेस कोणताच प्रतिबंध नाही.


१०) दत्त व दत्त संप्रदायाचा नाथ,महानुभाव.वारकरी, रामदासी इ.उपासना पंथांशी घनिष्ट संबंध आहे. उदा.गोरक्षनाथ हे दत्तात्रयांचे शिष्य,महानुभाव पंथात एकमुखी दत्ताची पूजा होते. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांचे साक्षात दर्शन झाले होते आणि विशेष म्हणजे स्वत: दत्तात्रेय हे निस्सिम देवी भक्त होते.  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


११) औदुंबरतळी वस्ती,जवळ धेनू व श्वानांचे सान्निध्य हे दत्तावताराचे आणखी एक प्रमुख वैशिष्ट्य.


१२) “त्रिमुखी” किंवा”एकमुखी ” दत्तात्रेयांच्या मूर्तीप्रमाणेच ” दत्तपादुकां “ची ही पूजा अर्चा अनेक दत्तस्थानां वर केली जाते.


१३) ‘ गुरुवार ‘ हा दत्तांचा वार.याच दिवशी घराघरांतून व दत्तस्थानांतून दत्तात्रेयांचे भजन-पूजन भक्तिभावाने केले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमा ही” दत्तजयंती ” म्हणून साजरी करतात.


१४) श्रीदत्तात्रेयांचे १६ प्रमुख अवतार आहेत.  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


१५) श्रीदत्त उपासनेत योगाला अनन्य साधारण महत्व आहे. शाक्त व तांत्रिकांनी ही श्रीदत्तात्रेयांना आपले आराध्य दैवतमानले आहे.


१६) श्रीदत्तात्रय हे शरणागतवत्सल व भक्तांवर अनुकंपा व दया करणारे आहेत.आणि म्हणूनच नुसत्या स्मरणानेच ते भक्ताची आर्त हाक ऐकून धाऊन येतात.


१७) धर्म व अध्यात्मात व्यापक व उदार दृष्टिकोन हा दत्तावताराचा आणखी एक विशेष आहे.


१८) दत्त संप्रदायाचेच तत्त्वज्ञान उदात्त.दिव्य,भव्य. निर्मळ व सोलीव अध्दैत स्वरुप आहे.


१९) भूत -प्रेत-पिशाच्चे दत्तात्रेयांच्या वाऱ्यालाही उभी राहात नाहीत.


२०) दत्तात्रेयांच्या व्यापक व उदार दृष्टीमुळे ही उपासना प्रणाली किंवा संप्रदाय कल्पान्ता पर्यँत खचितच पथ प्रदर्शन करीत राहील.


२१) जोपर्यँत जगामध्ये मानव हा तापत्uरयांनी त्रस्त व पीडित असा राहील तोपर्यंत दत्तात्रेय अज्ञानान्धकारात त्यास सदैव मार्गदर्शन करीतच राहतील.


अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त……..  Shree Gurudev Datta,Shri Swami Samarth,


॥ शुभं भवतु ॥

Post a Comment

0 Comments