औदुंबर माहात्म्य, Shri Gurudev Datta

औदुंबर माहात्म्य

 श्रीगुरुचरित्र ग्रंथातून 

     कृष्णा-पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट असलेल्या औदुंबर वृक्षाखाली श्रीगुरु नृसिंहसरस्वतीनी वास्तव्य केले होते. कारण त्या ठिकाणी अश्वरादी सारखे अनेक वृक्ष असले तरी श्रीगुरुंची औदुंबरावरच जास्त प्रीती होती. Shri Gurudev Datta

     कारण पूर्वी नृसिंह अवतारात भगावान विष्णूंनी आपल्या नखांनी हिरण्यकृश्यपाचे पोट फाडून त्याचा वध केला. त्या दैत्यराजाच्या पोटात कालकूट विष आसल्यामुळे त्याच्या हातांच्या बोटांची व नखांची आग होऊ लागली. Shri Gurudev Datta

     त्यावर उपाय म्हणून लक्ष्मीने औदुंबराची फळे आणली. नृसिंहाने त्या फळांमध्ये आपली नखे रोवली तेव्हा कोठे हा दाह शमला. त्यायोगे नृसिंहाचा क्रोधही कमी झाला. त्यानंतर लक्ष्मी व नृसिंहानी प्रसन्न होऊन वरदान दिले की, "औदुंबरा ! तुला नेहमी फळे येतील, लोक तुला कल्पवृक्ष म्हणतील, तुला जे पूज्य मानून तुझी भक्तिभभावाने सेवा करतीलषा ते पापमुक्त होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील." Shri Gurudev Datta

     तसेच तुझ्या सेवेने वांझ स्त्रीला सःतती होईल, गरीबाचे दैन्य जाईल. नदीकाठी तुझ्या छायेत स्नान केल्याने गंगास्नानाचे पुण्य लाभेल. तुझ्या छायेत बसून जपादी अनुष्ठाने केल्याने आनंतपट फलप्राप्ती होईल. Shri Gurudev Datta

     तुझी सेवा करणारा व्याधीमुक्त होकऊन आरोग्यसंपन्न होईल. त्याचे ब्रह्महत्यादी महादोष नष्ट होतील, त्याच्या सर्व कल्पना फलद्रूप होतील. मी लक्ष्मीसहित तुझ्या सन्निध्य वास करीन." Shri Gurudev Datta

     "श्रीगुरु नृसिंहमंत्राचा नित्य जप करीत असत.त्या जृपाने उग्रता येऊ नये, शांती राहावी म्हणून ते औदुंबराखाली वास करीत असे." श्रीगुरु नृसिंहसरस्वती औदुंबराचे माहात्म्य जाणून होते म्हणूनच त्यांना त्याची आवड होती. Shri Gurudev Datta

     *आमरेश्वरासन्निध्य ज्या चौसष्ट योगिनी वास करीत होत्या त्या मध्यान्हसमयी स्त्री रुपाने श्रीगुरुंपाशी येऊन त्यांना वंदन करीत. त्यांना आदराने आपल्या स्थानी नेत. तेथे त्यांची षोडशोपचारे विधीयुक्त पूजा करुन त्यांना प्रेमाने भोजन देऊन पुन्हा औदुंबरापाशी आणून सोडून जात असत. Shri Gurudev Datta

Post a Comment

0 Comments