श्री क्षेत्र मंथनगड येथील मंदिर


🌹 श्री दत्तात्रेय 🌹
🌺 श्रीदत्त तिर्थक्षेत्र 🌺

श्रीक्षेत्र मंथनगड 



🚩"श्री क्षेत्र मंथनगड (मंथनगुडी) महेबुब नगर (आंध्रप्रदेश)🚩

श्री क्षेत्र मंथनगड येथील मंदिर 

श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी यांचा प्रिय शिष्य वल्लभेश हा कुरव्पूरला नवस फेडण्यासाठी जात असता श्री क्षेत्र मंथनगड या ठिकाणी चोरांनी त्यास अडवूनत्याची हत्या केली. त्यामूळे श्रीपाद वल्लभ स्वामींनी अवतार संपल्यानंतर सुध्दा आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी येथे प्रकट होऊन आपल्या प्रिय शिष्यास परत जिवंत केले. shri gurudev datta

श्री क्षेत्र मंथनगड हे स्थान असे जन्मास आले!
संदर्भ- गुरुचरित्र अध्याय १०




यासंबधी सिध्दस्वामीने नामधारकास असे सांगितले की श्रीपाद श्री वल्लभांचे अक्षय निवासस्थान श्री क्षेत्र कुरवपूर आहे. आपली श्रद्धा व भक्ती असेल तर स्वामी त्यास प्रचिती देतातच. या संदर्भात त्यांनी एक कथा सांगितली. ती अशी; shri gurudev datta


कश्यप गोत्रातील श्री वल्लभेश नावाचा एक विप्र श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता. तो वारंवार कुरवपुरी येत असे व श्री पादुकांची सेवा करीत असे. पूजा अर्चा करीत असे वं श्रीक्षेत्री मोठ्या प्रमाणात अन्नदानही करीत असे. एकदा त्याने आपली मनोकामना श्री चरणी प्रकट केली व नवस केला की जर माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी श्री चरणी मोठी सेवा करेन व सहस्त्र ब्राह्मणास भोजन अर्पण करीन. भक्त काम कल्पदृम अशा श्रीपादांचे कृपेने त्यास शतगुणा फायदा झाला. तो अत्यंत आनंदी झाला व श्रीगुरुस्थानी नवस फेडण्यास व श्री गुरुचरणी कृतज्ञतेने सेवा करण्यास कुरावपूरकडे निघाला. जवळ नवस फेडण्यास द्रव्य व साधनसामुग्री घेऊन निघाला. काही तस्करांनी कपटाने त्याचा विश्वास संपादन केला व आपणही दरवर्षीच्या नियमानुसार श्री क्षेत्रीच जात असल्याचा निर्वाळा दिला. वल्लभेश ब्राम्हणाने त्यांच्याबरोबरच प्रवास सुरु केला. एके दिवशी त्या तस्कराने त्यास झोपेतच ठार केले. श्रीपाद श्रीवल्लभ सर्वच जाणतात ते त्यांच्या एकनिष्ठ सेवकासाठी धावून आले. आणि काय! त्यांनी आपल्या त्रिशूळानी तिघांना मारले एक तस्कर श्रीचरणी नतमस्तक झाला क्षमा मागितली व म्हणाला स्वामी आपण सर्वज्ञानी आहात, आपणास माहिती आहे मी निर्दोष आहे तर आपण मला जीवदान द्या.shree gurudev datta


श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या त्रिशूळानी तिघा तस्करांना मारले आणि वल्लभेश ब्राम्हणाचे रक्षण केले ती जागा 
भक्तवत्सल श्रीपादांचे मनात दया आली. व त्यांनी त्याचे हाती विभूती दिली व वल्लभेश ब्राम्हणाच्या गळ्यास लावून मस्तक धडास जोडण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य! वल्लभेश उठून बसला, व त्यास आश्चर्य वाटले की हे सहप्रवासी भक्त यांना कोणी बरे मारले? तेव्हा त्या तस्करांने सर्व हकीकत त्या ब्राह्मणास सांगितली व म्हणाला "अरे ते संन्यासी कोठे गेले? आत्ता येथे होते." वल्लभेश तर जे समजायचे ते समजून गेला. श्री गुरुकृपा होय ज्यासी, कालिकाळाचे भय नाही. त्यांनी श्री गुरु क्षेत्र कुरवपूर येथे जाऊन पूजा व सहस्तरब्रह्मण भोजन समारंभ मोठ्या आनंदाने पार पडला.shree gurudev datta

ज्याठिकाणी श्रीपादश्रीवल्लभ प्रकट झाले ते स्थान म्हणजे मंथनगड. यास्मृती प्रित्यर्थ तेथे गुरु मंदिर बांधण्यात आलेलें आहे.


या क्षेत्री असे जावे

श्री क्षेत्र मंथनगड हे ठिकाणहैद्राबाद रायचूर बस मार्गावर मतकल पासून हे क्षेत्र १० कि. मी. अंतरावर आहे. मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात. मतकल-नरवा आणि मतकल-उजेकोट या बसेस मंथन गड येथून जातात. श्री क्षेत्र कुरवपुरला मतकल मार्गे जातांनाअगर येतांना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपादश्रीवल्लभांचे दर्शन घ्यावे. अशा या प्रासादिक क्षेत्री श्री गुरुचरणरज स्पर्श दर्शनाचा लाभ आपणास झाल्या शिवाय राहणार नाही. फक्त आवश्यकता आहे ती एकनिष्ठ भक्तीची!" shree gurudev datta

Post a Comment

0 Comments