श्रद्धा असल्यास दत्त महाराजांच्या सोबत त्यांचेही दर्शन शक्य आहे



जन्मताच मायेने गुरफटून कोहं असे न रडता ब्रह्मस्वरूप ॐकार जपणारा ,सजीवांप्रमाणेच निर्जीवांवर सत्ता असणारा ,सर्व वेदांचे उत्पत्ती स्थान तोच असल्याने असल्याने समग्र वेद जाणणारा आणि म्हणणारा ,क्षणभंगुर आयुष्य अर्थात काळ हि त्याचीच माया आहे तेव्हा त्याचे वर्म जाणणारा ,तीर्थांचे पावित्र्य जाणणारा आणि आपल्या पदस्पर्शाने वाढवणारा ,सन्यास धर्माचे पालन करणारा आणि त्याचे महत्व विशद करणारा ,देहव्यापी रोगांचा अस्त करणारा ,अमानवी अस्तित्वांवर सत्ता गाजवणारा व त्यांना आपल्या अधिकारात ठेवणारा ,समस्त राजांचा राजा ,योग्यांचे दैवत ,ज्याचे दर्शन आणि आशीर्वाद मोक्षस्वरूप आहे असा परमात्मा म्हणजेच दत्त महाराज भक्तांच्या सोयीकरिता नृसिंहवाडी क्षेत्री येऊन राहिले आहेत . shree swami samarth


दत्त महाराजांच्या स्वरूपाला जाणणारे या राजधानीत कोण आहेत ? पुष्कळ आहेत . हे सर्व त्यांच्या अवताराचे गुह्य जाणणारे भक्त आहेत . हे गुह्य जाणणारे त्यांच्याकडे सान्निध्याखेरीज काहीही मागत नाहीत . काय मागणे आहे तर केवळ तुम्ही जवळ असा आणखी काही नको . मान - सन्मान ,पैका अडका ,प्रसिद्धी ,काही काही नको केवळ तुमचे स्मरण आणि लीला आठवून आम्ही त्या भाव विश्वात तल्लीन होऊ .  shree swami samarth



आता हे गुह्य जाणणारे कोण असे विचारता त्यांचा सनकादिक असा गौरवपर उल्लेख महाराजांच्या राजधानीत केला जातो . रामचंद्र योगी महाराज ,नारायण स्वामी महाराज ,गोपाळ स्वामी महाराज ,गोविंद स्वामी महाराज ,थोरले महाराज ,कृष्णानंद सरस्वती महाराज ,दीक्षित स्वामी महाराज --- यादी करू पाहता बरीच मोठी आहे . दत्त महाराजांच्या राजधानीचे हे एक वैशिष्ठ्य म्हणावे लागेल ,अन्यत्र कुठेही इतके सिद्ध पुरुष वास करून नाहीत .  shree swami samarth

आजही हे सर्व आपल्या उपास्य दैवतापाशी राहिलेले दिसून येतात . आपली श्रद्धा असल्यास दत्त महाराजांच्या सोबत त्यांचेही दर्शन शक्य आहे --   shree swami samarth

 *!!! श्रीगुरुदेव दत्त !!!*

Post a Comment

0 Comments