दत्त महाराज मनातील भक्तिभाव पाहतात

 



नुकतीच महापूजा झाली होती ,नृसिंहवाडीच्या कट्ट्यावर आम्ही आमच्या गुरुजींची वाट पाहत होतो . आमच्यातील सर्वात जेष्ठ नाना परांजपे ,सर्वार्थाने जेष्ठ ,वयाने ,अधिकाराने . म्हणाले ,दत्त महाराजांना मध्यान्हाला काय आवडतं ? तुम्हीच सांगा नाना या सर्वांच्या उद्गारावर म्हणाले मी सांगेन पण सर्वात शेवटी . आधी तुम्ही सर्वानी सांगा . आचार्य तुमच्यापासून सुरुवात करू .  Shri Gurudev Datta


मी घेवड्याची भाजी असे म्हणत आपले गुरुचरित्रातील ज्ञान प्रकट केले . तोवर आमच्या काकू म्हणाल्या ,जोंधळ्याच्या कण्या महाराजांना खूप आवडतात . शिरोळच्या भोजनपात्राच्या कथेत भुरके मारत महाराजांनी त्या खाल्ल्याचा उल्लेख आहे . लगेच आणखीन कोणी म्हणाले ,अहो माध्यान्हाला महाराजांना तापवलेलं दूध देखील आवडत ,बाविसाव्यात गुरुचरित्रात महिषीला दुग्धवंती केल्याच्या अध्यायात तसं म्हटलं आहे .   Shri Gurudev Datta


दत्त माहात्म्यातील उदाहरण देत कोणी म्हणाले ,विष्णुदत्त ब्राह्मणाकडे जो   Shri Gurudev Datta


स्वयंपाक त्या गृहस्वामिनीने केला होता , दत्त महाराज त्याने संतुष्ट झाले . अर्थात जे असेल त्यात या अर्थाने . अनेक मतमतांतरे झाल्यावर नाना म्हणाले ,अहो दत्त महाराज हे केवळ भावाने संतुष्ट होतात . मग केवळ वरण भात असो वा केवळ घेवड्याची भाजी असो . मनातील निस्सीम भावाने ते संतुष्ट होतात आणि भक्ताने दिलेला पदार्थ आनंदाने ग्रहण करतात .आणि या भक्तीने मिळणारे फल देखील अप्रमेय असते . अर्थात कोठेही गणित अथवा परिमाण नसलेले .  Shri Gurudev Datta

   पुण्यवान  व्यक्तीचे महत्त्व 

माध्यान्हाला जे असेल त्याचा नैवेद्य दररोज अवश्य असावा ,पदार्थाची रुची ,स्वाद अथवा श्रीमंती दत्त महाराज पाहत नाहीत तर ते मनातील भक्तिभाव पाहतात . श्रीगुरुदेव दत्त !!!  Shri Gurudev Datta

Post a Comment

0 Comments