आनंदापेक्षाही मोठा आनंद




आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करतो. Shri Swami Samarth

आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावाच ठरवतो. माणूस एक अजब रसायन आहे, आवडला तर त्याचे दोष दिसत नाहीत,नाही आवडला तर त्याचे चांगले गुण पण दिसत नाहीत, कानाने ऐकल तर फक्त शब्दांचा आवाज येतो, परंतु मनाने ऐकल तर शब्दांचा अर्थ समजतो. चांगले मित्र आणि औषधे ही आपल्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचे काम करतात. Shri Swami Samarth

फरक इतकाच की औषधांना एक्स्पायरी डेट असते, पण मैत्रीला नाही, ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस तीच वेळ आपल्यासाठी "शुभ" जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. मरतानाही पाहणार नाहीत तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते आपल्यासाठी सगळेच दिवस सर्वच वेळ शुभ आहे. Shri Swami Samarth

फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी आणि मन स्वच्छ असाव, नातं रक्ताच असो किंवा मानलेल मदतीच्या वेळी जे आधार देतात ते खर नात, प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात. Shri Swami Samarth

ती माणस बुद्धिमान असतात, बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे वळविणे म्हणजेच खरे शिक्षण होय. मनमोकळ जगण, मनासारख जगण यातल अंतर कळालं की आयुष्याच्या वाटा कळतात कष्ट करून फळ मिळवणे, म्हणजे व्यवहार स्वतः जगून दुसर्‍यांना जगू देणे म्हणजे "सहानुभूती आणि माणुसकी" शिकून माणसासारखे वागणे, सुखाचे अनेक भागीदार भेटतील, पण दुःखाचे साथीदार भेटायला माणुस नशीबवान असावा लागतो. Shri Swami Samarth

चालण अंतर ठेवून असावं पण बोलणं अंतर ठेवून नसावं कारण जीवनात गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. पैसा कमावून माणूस जास्तीत जास्त श्रीमंत होऊ शकतो, मोठा नाही मोठा होण्याकरिता आधी त्याला विचाराने श्रीमंत व्हावं लागत, भूतकाळाचा जास्त विचार केला तर डोळ्यात पाणी येईल. भविष्याची काळजी केली तर मनात समस्या निर्माण होतील, पण वर्तमानातील प्रत्येक क्षणाला सामोरे गेलात तर जीवनात आनंद निर्माण होईल माणुस असो किंवा पशू पक्षी जो पर्यंत आपल्या पालकांच्या क्षेत्र छायेत असतो, तो पर्यंत त्यांना कोणतीच फिकीर नसते, कारण सुरक्षा अशी भावना आहे, जी मिळताच प्रत्येकजण निश्चिंत होतो. Shri Swami Samarth

लोकांचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे केलेले "आत्मपरीक्षण" कधीही उत्तम ज्याला धन कमवायचे आहे. त्यांनी "कण" सुद्धा वाया घालवू नये आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे,त्यांनी "क्षण" सुद्धा वाया घालवू नये. एक मात्र नक्की खर आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक, चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातंच माणूस एकाच कारणामुळे एकटा पडताे. आपल्या माणसांना साेडण्याचा सल्ला ताे परक्या माणसांकडून घेताे, अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे. Shri Swami Samarth




हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते, नेहमी वाटत की लोक आपल्याला दुखावतात, पण तस नसत तर ते आपल्याला काही तरी शिकवून जातात. बोध काय घ्यायचा हाआपला भाग झाला पण भ्रमनिराश होण हा दोष झाला. एकनिष्ठ रहा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुध्दा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे. संकट कितीही मोठे असुद्या लक्षात ठेवा आपण संकटापेक्षा खूप मोठे आहोत,आयुष्य चांगल जगाव म्हणून मनुष्य जीवनभर धडपड करतो, सुखाच्या शोधात जीवनभर वणवण भटकतो, पण माणसाला शेवटी कळत की खरे सुख हे वणवण भटकण्यात नाही. तर ते फक्त समाधान मानण्यातच आहे नशीबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कस राहता येईल, हे ज्याला कळल ना तोच खरं आयुष्य जगायला शिकला आयुष्यात सगळे दिवस सारखे नसतात चढ-उतार येतच राहतात, फक्त चढ आला की माजायच नाही. Shri Swami Samarth

उतार आला की लाजायच नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी सुखी माणसाचा सदरा हा समाधानी माणसाच्या अंगावरच सापडतो सुख आपल्या हातात नाही. पण सुखाने जगणे आपल्या हातात आहे विचाराने श्रीमंत आणि मनाने समाधानी असणारी व्यक्ती सदैव सुखी असते.हसणे फार सुंदर आहे दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर आणि वंदनीय आहे. मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे, स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे मात्र दुसऱ्या- साठी रडणे प्रेम आहे.
जीवनात हसणे रडणे अटळ आहे,फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष, परो-पकारी असला की सर्व जीवन श्रीगुरुकृपेने आनंदमार्गी सुंदर.Shri Swami Samarth

Post a Comment

0 Comments