सूर्यनमस्कार आणि ध्यान
मनुष्याच्या जीवनात व्यायामाला फार महत्तव आहे. पुरातन काळापासून मनुष्य व्यायाम करत आला आहे. ज्याला जीवन भरपूर आणि आरोग्यदायी जगायचे आहे त्याने जीवनात रोज थोडा तरी व्यायाम केला पाहिजे. रोजचे काम आणि वयाम यामध्ये फरक आहे. ज्यांचे रोजचे काम कष्टाचे आहे त्यांचे ठीक आहे. कारण त्यांचा शरीराला थोडा तरी व्यायाम मिळतो. पण त्यांनीसुद्धा रोज व्यायाम केलेला चांगला. ज्यांचे काम बैठे आहे त्यांनी तर रोज थोडा व्यायाम केला पाहिजेच. सध्यच्या जीवनात कॉम्पुटर मुळे बरेच लोकांचे काम बैठे झाले आहे. त्यामुळे तरुण लोकांमध्ये. बऱ्याच शारीरिक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यासाठी नेहमी औषधे कामाची नाहीत. जर रोज काम करताना दर एक, दोन तासाने जर थोडे शरीर स्ट्रेच केले तरी बऱ्याच समस्या कमी होतील.
व्यायामाचे बरेच प्रकार आहेत. पण सगळ्यात सोपा आणि कमी जागेमध्ये करता येणार व्यायाम म्हणजे, सूर्यनमस्कार याला बरीच कमी जागा लागते आणि यामध्ये सगळे शरीर स्ट्रेच किंवा ताणले जाते. शरीर ताणल्यामुळे सर्व अवयव चांगले काम करतात,रक्त्तभिसरण सुधारते, शरीरामध्ये नेहमी उत्सच्चाह राहतो.
सूर्यनमस्काराबरोबर आपण रोज जर थोडे ध्यान केले तर शरीराबरोबर आपले मन सुद्धा निरोगी आणि चांगले, आनंदी राहील. जसे शरीराला व्यायामाची गरज आहे तशी मनाला सुद्धा व्यायामाची गरज आहे. मनाचा व्यायाम म्हणजे ध्यान करणे होय.ध्यानाचा उगम भारतातच झाला आहे. आता संपूर्ण जगामध्ये ध्यानाचे महत्व समजेल आहे. त्यामुळे सर्व जण यांचा फायदा घेत आहेत. आपण सुद्धा ध्यान करून जीवन सफल केले पाहिजे. ध्यानाने आपल्याला ईश्वर प्राप्ती होऊ शकते. करा ध्यान करत आपण असल्यामुळे आपण आपल्या मूळ स्थानावर पोचत असतो. ध्यानाचे काय फायदे असतात हे आम्ही आमच्या ब्लॉग मध्ये दिले आहे.
सूर्यनमस्कार कोणते आणि कसा करायचे यांचे चित्र रूपामध्ये आम्ही आणि ध्यानाचे फायदे आमच्या ब्लॉग मध्ये संपूर्ण माहिती दिली आहे. याचा तुम्ही जीवनात वापर केलेत तर तुमचे शरीर आणि मन दोन्ही स्वस्थ्य होतील. धन्यवाद...!
0 Comments