मी नसतो तर काय झालं असतं? Jai Shri Ram, Ram

 

मी नसतो तर काय झालं असतं?


एकदा हनुमान प्रभू श्रीरामाला म्हणाले की, अशोक वाटिकामध्ये जेंव्हा रावण रागाच्या भरात तलवार घेऊन सीता मातेला मारण्यासाठी आला तेंव्हा मला वाटले की याच्याकडील तलवार घेऊन याचं डोकं उडवलं पाहिजे, पण तेवढ्यात मंदोदरीने रावणाचा हात धरला. पण मी जर खाली उतरून रावणाचा हात धरला असता तर मला भ्रम झाला असता की, मी नसतो तर काय झालं असतं…Jai Shri Ram, Ram

 

अनेकवेळा अनेकांना असाच भ्रम होतो, मलाही वाटलं असतं की मी नसतो तर सीता मातेला कोणी वाचवलं असतं ? पण तुम्ही सीता मातेला वाचवलंच नाही तर वाचवण्याचं काम रावणाच्या पत्नीकडे सोपवलं. तेंव्हा मला समजलं की तुम्हाला ज्याच्याकडून जे कार्य करवून घ्यायचं आहे ते तुम्ही त्याच्याकडूनच करवून घेता. Jai Shri Ram, Ram

 

पुढे जेंव्हा त्रिजटा म्हणाली की, लंकेत एक वानर आले आहे, ते लंका जाळून टाकणार आहे. तेंव्हा तर मी चिंतेत पडलो की, प्रभू श्रीरामाने तर आपल्याला लंका जाळण्यासाठी सांगितले नाही. आणि ही त्रिजटा म्हणत आहे तर काय करू ?

पण जेंव्हा रावणाचे सैनिक मला मारण्यासाठी आले तेंव्हा मी बचावासाठी काहीच प्रतिकार केला नाही. आणि जेंव्हा बिभीषण येऊन म्हणाला की, दूताला मारणे अनीति आहे, तेंव्हा मला समजले की प्रभूने मला वाचवण्यासाठी हा उपाय केला आहे.



 आश्चर्याची गोष्ट तर तेंव्हा घडली, जेंव्हा रावण म्हणाला की, वानराला मारले जाणार नाही तर त्याच्या शेपटीला कपडा गुंडाळून त्यावर तूप टाकून आग लावा. तेंव्हा मला समजलं की त्रिजटाचं म्हणणं बरोबर होतं. नाहीतर लंका जाळण्यासाठी मी कुठून तूप, कपडा, अग्नी आणला असता. पण ही व्यवस्था पण तुम्ही रावणाकडून केली. जेंव्हा तुम्ही रावणाकडून सुद्धा काम करवून घेता तर माझ्याकडून करवून घेणं काय विशेष आहे. Jai Shri Ram, Ram

 

त्यामुळे नेहमी लक्षात ठेवावे की, *आपल्या आयुष्यात जे काही होत* *आहे ते सर्व भगवंत करवून घेत आहे. आपण तर फक्त निमित्ताला* *कारण आहोत. त्यामुळे कधीही या भ्रमात राहू* *नका की मी नसतो तर काय झालं असतं…Jai Shri Ram, Ram

 

    *श्री गुरूदेव दत्त*

 

Post a Comment

0 Comments