गणपती स्तोत्र आणि १२ नावे यांचा अर्थ, Ganesh Stotra in Manrathi

 ||गणपती स्तोत्र आणि १२ नावे यांचा अर्थ ||



 स्तोत्र म्हणायला अतिशय सोप्पे आणि प्रासादिक आहे... 

 द्वादशनाम गणपती स्तोत्र एक खूप मोठे ज्योतिषीय रहस्य आहे

 याच्या नित्य पठणाने पत्रिकेतील १२ ही घरांचे दोष दूर होतात. पण रोज कमीत कमी १२ वेळा म्हंटले पाहिजे


 पत्रिकेतील पहिले स्थान - गणपतीचं नाव - "वक्रतुंड" - तनु म्हणजे शरीराचं स्थान!


द्वितीय स्थान - गणपतीचं नाव - "एकदंत" - वाचा, जिव्हा, धनस्थान, शुद्धीकरण, मन आणि बुद्धी शुद्धीकरण !

 

तिसरे स्थान - गणपतीचं नाव - "कृष्णपिंगाक्ष" डोळे, पराक्रम!

 

चौथे स्थान - गणपतीचं नाव - "गजवक्त्रं" - श्वास, छाती, सौख्य, मातृस्थान

 

पंचम स्थान - गणपतीचं नाव - "लंबोदर" - पोट, उपजीविका, साधन आणि संतती

 

षष्ठम स्थान - गणपतीचं नाव - "विकटमेव" - रोग शुद्धी, शत्रू नाश

 

सप्तम स्थान- गणपतीचं नाव - विघ्न राजेंद्र - राजस सुखे, विवाह स्थान शुद्धीकरण

 

अष्टम स्थान - गणपतीचं नाव - धुम्रवर्ण - गूढ मृत्यूस्थान शुद्धीकरण!

 

नवम स्थान - गणपतीचं नाव - "भालचंद्र" - भाग्य स्थान शुद्धीकरण!

 

दशम स्थान - गणपतीचं नाव - "विनायक" - कर्म स्थान, नोकरी व्यवसाय प्राप्ती

 

एकदशम स्थान - गणपतीचं नाव - "गणपती" - मित्र स्थान. चांगल्या मित्रांची प्राप्ती याला लाभ स्थान असेही म्हणतात!

 

आपण सगळे गणपती बाप्पा मोरया म्हणतो म्हणजे मित्र आणि लाभ मिळू लागतात.

 

द्वादश स्थान - गणपतीचं नाव - "गजानन" हे रिपू किंवा शत्रू स्थान गजानन नामाने शत्रू अंतर्गत बहिर्गत दोनीही शांत होतात!

 

स्तोत्र सिद्ध करायची पद्धत - सहा महिने नित्य नेमाने वाचा. असे खुद्द स्तोत्र कर्ता ऋषी देवर्षी नारद सांगत आहेत.

 

 

प्रणम्यं शिरसां देवं गौरीपुत्र विनायकम्। 

भक्तावासं स्मरेन्नित्मायु: कामार्थसिद्धये।। 

 

प्रथमं वक्रतुण्डं एकदतं द्वितीयकंम्। 

तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम्।।

 

लम्बोदरं पञ्चमं षष्ठं विकटमेव च। 

सप्तमं विघ्नराजं धूम्रवर्णं तथाष्टमम्।।


 

नवमं भालचद्रं दशमं तु विनायकम। 

एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननमं।।

 

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यं पठेन्नर: 

विघ्रभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो।।

 

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं। 

पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम।। 

 

जपेद्गणपतिस्तोत्रम षड्भिर्मासै: फलं लभेत। 

संवत्सरेण सिद्धिं लभते नात्र संशय:।। 

 

अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्य लिखित्वा : समर्पयेत। तस्य विद्याभवेत्सर्वा गणेशस्य प्रसादत:।।

 

इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम श्री गणपती स्तोत्रं संपूर्णम्

============================================================

खाली दिलेली पोस्ट सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल 

संकटनाशन स्तोत्रात उल्लेखिलेली बारा नावे व त्यांची सद्यस्थाने 12 Names of God Ganesh in Ganpati Stotra

 

Post a Comment

0 Comments