ईर्षा - Jealousy

 ईर्षा(Jealousy)
                               

एकदा ब्रह्मवदेव स्वतः रथातून जात असताना सारथी अचानक रथ थांबवतो. ब्रह्मदेवाने कारण विचारले असता, तो सांगतो की एक छोटा प्राणी बसला आहे. तो रस्त्यातून बाजूला होत नाही.. म्हणून रथ थांबवावा लागला. त्याला बाजूला होण्याची विनंती कर. थोड्या वेळाने ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्या वर सारथ्याने सांगितले की, तो प्राणी पूर्वी होता त्यापेक्षा मोठा झाला आहे. Jealousy

ब्रह्मदेवाने सांगितले की, त्याला चाबूक दाखव म्हणजे तो बाजूला जाईल. Jealousy

ब्रह्मदेवाने पुन्हा विचारल्यावर कळले की, तो प्राणी अधिकच मोठा झाला आहे. आता तो प्राणी तर एका डोंगरा एवढा मोठा झाला आहे. आणि रथावर चाल करून येत आहे.

हे ऐकताच ब्रह्मदेव म्हणाले, रथ मागे घे आणि त्याला सांग की, 'तूच श्रेष्ठ आहेस, आम्ही रथ वळवतो आणि दुसऱ्या मार्गाने जातो. ' Jealousy

सारथ्याने हे सांगितल्यावर तो प्राणी एकदम मुंगी इतका छोटा झाला आणि रस्त्यातून बाजूला झाला.

आश्चर्यचकित झालेल्या सारथ्याने ब्रह्मदेवास याचे कारण विचारता देवाने सांगितले की, त्या प्राण्याचे नाव ईर्षा असे होते. Jealousy

आपण जेवढे महत्त्व त्याला देऊ तेवढा तो मोठा होत जाईल. मात्र आपण स्पर्धेतून दूर झाल्यावर ईर्षा राहिली नाही आणि तो सामान्य स्वरूपात आला.

सर्वच स्पर्धा जिंकण्या साठी खेळायच्या नसतात. काही वेळा फालतू स्पर्धेत भाग घेतल्या मुळे उगाच ऊर्जा व्यर्थ खर्च होते. काही वेळा नमते घेतल्या मुळे फायदाच होतो. Jealousy

याचप्रमाणे जग लोकांच्या नजरेने बघण्यापेक्षा आपल्या नजरेने बघावे. आपण सुखी आहोत, याची पावती लोकां कडून घेण्या पेक्षा आपले सुख आपणच अनुभवाव.

आपला निर्णय आपण घ्यावा आणि त्यास जबाबदार राहावे. Jealousy

लोक काय म्हणतील, याचा फार विचार करू नये. कारण एक दिवस प्रमाणा पेक्षा कोणीही आपल्याला जवळ करणार नाही, तेव्हा आपले सुख-दुःख आपणच अनुभवावे, आयुष्य तणावमुक्त होते.


Post a Comment

0 Comments