श्री धनकवडीचा योगी , Shankar Maharaj

श्री धनकवडीचा योगी 



एकदा महाराज पुण्यात असताना त्यांच्याकडे एक माणूस आला तो महाराजांना म्हणाला, गाणगपुरी जाऊन गुरुचरित्राची तीन पारायणं करायची इच्छा आहे. dhankawadi cha yogi

कशासाठी ॽ shankar maharaj

अवधूताचं दर्शन घडावं म्हणून. dhankawadi cha yogi

भडव्या !! दत्तगुरू काय तुझ्या बापाचे नोकर आहेत ॽ आणि काय रे भोसडीच्या, गाणगापूरपर्यंत जायला पैसा तरी आहे का खिशात ॽ shankar maharaj

महाराज दर वाक्यागणिक शिव्या देत होते. आणि शिव्या देऊन झाल्या की म्हणत, श्री गुरुदेवदत्त ! श्री गुरुदेवदत्त जणू काही त्या शिव्या भक्ताला दत्तगुरूंकडून आलेली प्रसादभेट होती !! भक्त म्हणाला, नाहीत खरे पैसे, पण घेईन कुणाकडून तरी उसने. पण दर्शनाची अगदी तळमळ लागून राहिलीय, महाराज. चैन पडत नाही. हे बोलताना त्याच्या डोळ्यांत खरोखरच पाणी आलं होतं. dhankawadi cha yogi

महाराज काही वेळ त्याच्याकडे एकटक पाहत राहीले. मग म्हणाले, मग पारायणाच्या आधी मला दर्शन द्या असं का नाही म्हणत त्यांना ॽ तुझी पारायणं होईस्तोपर्यंत त्यांनी काय ताटकळत बसायचं का होय रे साल्या ?
त्या बिचाऱ्याला काहीच समजेना. dhankawadi cha yogi

जा. बाहेरचं दार बंद करून घे. shankar maharaj

त्यानं उठून दार बंद करून घेतलं. आणि मागं वळून बघतो तो काय ॽ महाराजांच्या ठिकाणी त्याला साक्षात दत्तगुरू दिसले. अत्यानंदाने तो बेभान झाला. ओक्साबोक्शी रडू लागला. धावत येऊन त्यांच्या चरणाजवळ कोसळला. थोड्या वेळानं महाराज त्याला म्हणाले, पैसा नाही, तर कुठे जाऊ नकोस. इथेच खाली औदुंबराच्या पारावर बसून पारायण कर, पादुकांची पूजा कर माईच्या वाड्यात ते आहेत. असे म्हणून महाराज तिथून निघून गेले. shankar maharaj

जय शंकर 

Post a Comment

0 Comments