दुसऱ्याची बुद्धी पालटावी हा परोपकार कशाला हवा


|| श्री स्वामी समर्थ ||



दुसऱ्याची बुद्धी पालटावी हा परोपकार कशाला हवा? श्रीकृष्णानी एवढी शिष्टाई केली पण दुर्योधनाची बुद्धी पालटली नाही. Shri swami samarth

दुसऱ्याने कसेही वागू द्या. आपण कसे वागावे ते ठरवावे. फळाची अपेक्षा न ठेवल्याने दुसरा कसा वागतो हा प्रश्नच येत नाही.Shri swami samarth

फळाची अपेक्षा ठेवली तर फळ मिळेपर्यंत तळमळ. ते मिळाल्यावर टिकण्याची काळजी व गेल्यावर रडत बसायची पाळी. म्हणून मोबदला नको. मोबदल्याची अपेक्षा नसली म्हणजे समाधान टिकेल.Shri swami samarth

वृत्ती तयार केली पाहिजे. वृत्तीपर्यंत जाईल इतका परमार्थ खोल गेला पाहिजे. वृत्ती तयार झाल्याशिवाय परमार्थ आचरणात येणार नाही.Shri swami samarth

घड्याळाच्या वरच्या किल्लीचा आतल्या चाकांशी संबंध नाही, तोपर्यंत किल्ली फिरवून घड्याळ चालत नाही तसा वृत्तीशी संबंध पाहिजे. त्याकरता आजच्या "समाधान कशाने होईल" ह्या कल्पना बदलल्या पाहिजेत.Shri swami samarth

पैसा, वैभव, मुलेबाळे याने समाधान मिळत असेल तर ज्यांना त्या गोष्टी आहेत त्यांना समाधान का नाही ? Shri swami samarth

परमार्थ सोपा आहे पण आसक्ती, लोभ टाकला पाहिजे. विकारवश न व्हावे. त्यासाठी स्मरण हवे. त्याला नाम लागते.


Post a Comment

0 Comments