कर्माचा - सिद्धांत
कोणाचीही हाय लागून घेऊ नये, त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात.
काही लोकांना नाही पटणार हा विषय,
पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतलाय आणी त्याचे भोग ते भोगत असतात, त्यांना नक्कीच पटेल,!! ....
अनेक कारणांनी तळतळाट दिलेला असतो, ... Shree swami samarth
जसे की
1) शारिरीक, मानसिक, आर्थिक,...
2) अपमानास्पद वागणुक,...
3) कोणांचे मन दुखावले असू शकते,...
4) कोणावर अन्याय केला गेलेला असतो,...
5) कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते,.....
6) छळ केलेला असेल,.....
7) कोणाची हक्काची फसवून प्रॉपर्टी हडपली असेल.....Shree swami samarth
8) कोणाला अनिती करायला बळ दिल असेल......
9) शारिरीक दुखापत केलेली असेल, .......
10) विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल......
11) ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल.....
त्रासाचे कुठलेही कारण असो...
वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो, तो खुप दुःखी होतो, त्याचे मनोबल कमकुवत होत असते, पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते ,
जाणुन-बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल,
पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडुन चमत्कार होत नाही, किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काठीने मारत नाही , पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडुन अतिशय तेजस्वी नकारात्मक उर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते, मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट अस म्हटले जाते.
मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो, त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही, किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही, सतत अपयश येणे, घरात आजारपण येणे, अश्या अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात,....
आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व
आपल्या अंतर्मनालाच माहीत असते.
समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे. त्याची परतफेड शक्यतो याच जन्मात करावी लागते, Shree swami samarth
तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक,
चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब सव्याज परत करावाच लागतो,
मी एका पुस्तकात वाचले होते,
राजा धृतराष्ट्राचे शंभरच्या-शंभर पुत्र युध्दात मारले गेले,
तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की अस का व्हावे?
माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही,
की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या-सर्वच पुत्रांचा मृत्यु आपल्या डोळ्यांसमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे?
तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पुर्व-जन्म पहाण्याची दिव्य-दृष्टि दिली.
धृतराष्ट्र राजाने दिव्य-दृष्टिद्वारे पाहीले की साधारण पन्नास जन्मापुर्वी तो एक पारधी होता, आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती. आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले. मात्र आगीची झळ लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभरएक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपळून मृत्युमुखी पडली. धृतराष्ट्र राजाची त्यावेळची ती क्रिया होती, त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युध्दात मारले गेले तेव्हाच ते पुर्ण झाले.
एक शिष्य एका अरण्यात तप करत होता.आज त्याच्या तपाला बारा वर्ष पूर्ण झाली आणि गुरूने त्याला खूष होऊन एक आरसा भेट दिला आणि सांगितलं Shree swami samarth
कर्म हे फळ देऊनच शांत होते.
प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचा हिशोब हा होतोच,
हा प्रत्येकाच्या कर्माचा सिध्दांतच आहे,
चांगले कर्म,चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म, वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे-पुढे होऊ शकते.
हाच कर्माचा सिध्दांत आहे.
आता आपणच ठरवायचे आहे,आपले कर्म कसे हवे. Shree swami samarth
"जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर॥
क्षणीक सुखासाठी अपुल्या, कुणी होतो नितीभ्रष्ट"..
आणि हो महत्वाचे म्हणजे शेअर जरूर करा, चांगले विचार दुसऱ्यांपर्यत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे, कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल.......!
0 Comments