श्री गुरुचरित्र ग्रंथ Shri Guru Charitra

 *श्री गुरुचरित्र* 

श्री गुरुचरित्र ग्रंथ 
गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो. म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग; पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा/ गुरूउपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरूंनी केलेल्या चमत्कारांमागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यांतील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु-शिष्य संवाद हा त्यासाठीच असतो. Shri Guru Charitra

दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसंप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना 'ज्ञानेश्वरी' व ‘दासबोध’ प्रिय, नाथपंथीयाना जसा ‘नवनाथ भक्तिसार’ प्रिय, तसा दत्तभक्तांना ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे.

या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात ‘पाचवा वेद’ असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. पू. श्री. टेंबेस्वामी नेहमी सांगत की, "दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल;  Shri Guru Charitra




परंतू गुरुचरित्रातील किमान पाच ओव्या नित्य वाचनात असू द्या." दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे.
‘भक्तीमुक्ती परमार्थ । जे जे वांछिले मनात । ते ते साध्य होय त्वरित । गुरुचरित्र ऐकता ॥’ अशी त्यांची महती आहे.श्री नृसिंहसरस्वती योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते.

 या शिवाय यात व्रत-वैकल्ये सांगितली आहेत, यात्रांची वर्णने आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केला आहे. यात अश्वथ्य, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. ‘गुरुचरित्रा’त शिवपूजेचे माहात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे, शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन इत्यांदीची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथानेच समाजाला शाश्वत मूल्ये शिकविली. त्यांपैकी ‘पातिव्रत्य’ हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर ‘आतिथ्य’ हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढण्यासाठी ‘गुरुचरित्रा’त कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ, गुरुनिष्ठ अशा स्त्री-पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात. Shri Guru Charitra

‘गुरुचरित्रा’त वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी ‘चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून को कोणी प्रखर विरक्ती व अविचल भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करील त्याचा ‘प्रपंच’ आणि ‘परमार्थ’ दोन्हीही सुखाचे होतील हे त्रिवार सत्य! साहजिकच हा ग्रंथ हा सिद्धमंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही.
या ग्रंथातील तत्त्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्यास पोषक आहे. शेवटी ‘उद्धरेत आत्मनात्मानम्’ हेच खरे! आपलीच बरी-वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हेच तत्त्व या ग्रंथात पुन:पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे, असे आवर्जुन सांगितले आहे. याचे कारण असे की, हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास साहाय्य करते. Shri Guru Charitra




‘थिऑसॉफिकल सोसायटी’च्या अध्यक्षा विदुषी ऍनी बेझंट म्हणतात की, "गुरुचरित्राची एकेक ओवी म्हणजे एक ‘सिद्ध मंत्र’ असून त्याच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजे अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चारांच्या लहरींतून फारच प्रभावी असतात, असे दिव्यसृष्टी कंपन लहरी आणि ‘सप्तशती’ या दिव्य ग्रंथातील मंत्रांमुळे निर्माण होणाऱ्या लहरी या सारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात, हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. गुरुचरित्राचे कर्ते सरस्वती गंगाधर

गुरुचरित्रग्रंथातील प्रत्येक अध्यायात अशा अनेक ‘दृष्टांत-कथा’ आहेत. लोक त्याला ‘चमत्कार-कथा’ समजतात; पण त्यामागील भक्तिसूत्र जाणून घेऊन गुरुबोधाचे स्वरूप कळून घेतले पाहिजे. गुरुसेवेशिवाय गुरूकृपा होणे शक्य नाही. गुरुसेवेसाठी दृढ गुरुनिष्ठा हवी. गुरुकृपेसाठी साधना हवी. गुरुकृपा झाली तर शिष्याचे कल्याण होईल. ईश्र्वरदर्शन होणे हे परमार्थाचे साध्य असले तरी त्यातही अखंडपणाने आणि सर्वत्र दर्शनसुख प्राप्त होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. जीवनधन्यता त्यातच आहे. गुरुचरित्रात अनेकांना दु:ख संकटे यातून मुक्त होण्याचा उपासनाधर्म प्रतिपादला गेला असल्याने प्रापंचिकांचे जीवन आणि पारमार्थिकतेचे मार्गदर्शन यांचा मिलाफ गुरूचरित्रात आहे. पठण, चिंतन, मनन यांपैकी काहीही घडले तरी त्याची ‘यथोचित फलश्रुती’ देणारा हा प्रासादिक ग्रंथ आहे, हेच खरे! Shri Guru Charitra


‘गुरुचरित्रा’चे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य अभ्यासकांच्या नजरेतून निसटले आहे. ते हे की, यात वैदिक आणि अवैदिक या दोन्ही संस्कृतीच्या प्रवाहाचा संगम झालेला आहे. वेदनिष्ठेचा उद्घोष तर या ग्रंथात स्पष्टपणे ऐकू येतो. त्याच बरोबर वैदिकांच्या आचार धर्माचा ध्वनीही यात तितकाच स्पष्टपणे मिसळलेला आढळतो. लिंगपूजा ही अवैदिकांचीच. शिवपूजा म्हणजे ईश्वरपूजा, सोमवारचे व्रत, भस्मलेपन, रुद्राक्षधारण हे आचार त्याच परंपरेतले आहेत. इतकेच नव्हे, तर औदुंबर पूजा म्हणजेच वृक्षपूजा हाही आचार अवैदिकांचाच आणि म्हणूनच दत्तभक्तांप्रमाणेच शिवभक्तांनीही या ग्रंथाला आपले म्हटले आहे.
सरस्वती गंगाधर हे ‘गुरुचरित्रा’चे कर्ते. त्यांनी आपली माहिती देताना म्हटले आहे,
"आपस्तंब शाखेसी । गोत्र कौंडिण्य महाऋषि ।
साखरें नाम ख्यातीसी । सायंदेवा पा साव ॥’ (गुरुचरित्र १.४१) Shri Guru Charitra

यावरून ग्रंथकर्त्याचे उपनाव म्हणजे आडनाव ‘साखरे’ असून ते आपस्तंब शाखेचे कौंडण्यि गोत्री ब्राह्मण होते. ‘गुरुचरित्र’ ही सरस्वती गंगाधरांची ‘वाङ्मयी मूर्ती’. या ग्रंथाव्यतिरिक्त ‘शिवरात्री माहात्म्य’ हे २५२ ओव्यांचे लेखन अलीकडेच प्रकाशात आले असून त्यांनी रचलेले ‘श्रीनृसिंह सरस्वती स्तोत्र’ उपलब्ध आहे.
‘गुरुचरित्रा’ची मूळ संहिता आजमितीस उपलब्ध नाही. भाऊबंदकीच्या तंट्यात जप्ती आली तेव्हा सरस्वती गंगाधरांच्या हातची ‘गुरुचरित्रा’ची मूळ प्रत दुसऱ्या कोणाच्या हाती लागू नये; म्हणून भिंतीत पुरून टाकण्यात आले; कै. रा. कृ. कामत यांना गाणगापूर, कडगंची, वाडी, औदुंबर, कुरवपूर, केंगेरी, कुंदगोळ, आंबेवाडी, परोळकर, चिकोडी, बैलहोंगल, टेंबेस्वामीप्रत, साधलेशास्त्री प्रत इत्यादी अनेक हस्तलिखित प्रती उपलब्ध झाल्या. या प्रतीच्या आधारेच त्यांनी ‘गुरुचरित्रा’ची सध्या उपलब्ध असलेली प्रमाणित व संशोधित प्रत तयार केली.
‘गुरुचरित्रा’ची अध्याय संख्या नक्की किती? या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही; परंतू या ग्रंथाचे ५१ अध्याय आहेत, याला ‘अवतरणिके’त दोन आधार सापडतील.
‘सांगेन आता अवतरणिका ।
प्रथमपासूनि सारांश निक्का एक्कावन्नाध्यायपर्यंत ॥’(गुरुचरित्र ५२-१८)




‘गुरुचरित्रा’ची अवतरणिका कोणी रचली हे छातीठोकपणे सांगता येत नाही. 
"अवतरणिकेचा अध्याय हा सरस्वती गंगाधराचा नसून मागाहून कोणीतरी रचला आहे; परंतु तो उपकारकच आहे." असे कै. रा. कृ. कामत म्हणतात. इतकेच नव्हे, तर श्री. गुर्जर नावाच्या गृहस्थांनी शके १७९६मध्ये मुंबईच्या ‘निर्णयसागर’ छापखान्यात मुद्रित केलेले ‘शतश्र्लोकी गुरुचरित्र’ नावाचे पुस्तक म्हणजेच हा ‘अवतरणिका अध्याय’ होय, हेही ते स्पष्ट करतात. श्री. अप्रबुद्ध यांना सायंदेवाने अवतरणिका रचली असावी, असे वाटते; परंतू त्याला ठोस आधार नाही.

५२ अध्यायांमाणेच ४९ व ५३ अध्याय असलेल्या पोथ्याही आढळतात. गाणगापूरात उपलब्ध झालेली पोथी ५० अध्यायांची होती. कै. अण्णासाहेब पटवर्धन यांच्या मते ‘गुरुचरित्रा’त मंत्रशास्त्रातील एक अध्याय होता. तथापि, श्रीगुरूंच्या आज्ञेवरून तो वगळण्यात आला. कदाचित खुद्द सरस्वती गंगाधरांनीदेखील तो काढून टाकलेला असावा आणि म्हणूनच त्यांनी संशोधित केलेल्या प्रतीत काशीयात्रेचा अध्याय आहे याचा अर्थ असा की, ‘गुरुगीते’ची मूळ संहिता सायंदेवाकृत असावी किंवा ती सरस्वती गंगाधरांची स्वतंत्र कृती असावी, असे काही जाणकारांचे मत आहे.
श्रीनृसिंहसरस्वतीचे एक शिष्य सिद्ध यांच्या सेवेतच असत. त्यांनीच हे ‘गुरुचरित्र’ आपल्या नामधारक नामक शिष्यास सांगितले अशी कल्पना करून त्याच चरित्राचा विस्तार सरस्वती गंगाधरांनी केला. गाणगापूरापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेले ‘उत्तरकंची’ किंवा ‘कडगंची’ हे त्यांचे मूळ गाव. Shri Guru Charitra


‘गुरुचरित्रा’च्या तिसऱ्या अध्यायात, सिद्ध मुनींनी आपल्याकडील ‘पुस्तक’ दाखविले असा स्पष्ट उल्लेख नामधारक करीत आहे;

Post a Comment

0 Comments