आयुष्यभराची प्रतिष्ठा, Shri Krishna

 आयुष्यभराची प्रतिष्ठा

 

महाभारतातील युध्द संपवून कृष्ण घरी Shri Krishna

परतल्यावर पत्नी रुक्मिणीने त्याच्याशी 

वाद घालण्यास सुरुवात केली.


गुरु द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म 

यांना ठार मारणाऱ्याच्या बाजुने 

तुम्ही कसे काय उभे राहिलात.? Shri Krishna

कृष्णाने उत्तर दिले.


ते आयुष्यभर सत्याच्या मार्गावर चालत होते यात कुठलीच शंका नाही पण त्या दोघांकडून आयुष्यात एक पाप घडले. आणि त्यामुळे त्याच्या जीवनभराच्या सत्यमार्गावर पाणी फिरले. Krishna

रुक्मिणीने विचारले..

कोणते पाप.?

कृष्ण म्हणाला.

जेव्हा भर दरबारात द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा ते दोघेही दरबारात उपस्थित होते. दरबारातील जेष्ठ व्यक्ति म्हणून ते हा प्रकार रोखू शकत होते. पण त्यांनी तसे केले नाही.

त्यांचा हा एकच गुन्हा त्यांच्या सगळ्या सत्यमार्ग जगणे अर्थहीन करण्यास पुरेसा आहे. Shri Krishna


रुक्मिणीने विचारले.

मग कर्णाचे काय.?

कृष्ण म्हणाला, कर्ण दानशूर होता, यात

कुठलीच शंका नाही. त्याच्याकडे कुणी काही मागितले तर त्याच्या तोंडून कधीही 'नाही' असा शब्द बाहेर पडला नाही.


पण बलाढ्य सैन्यासमोर यशस्वीपणे लढताना अभिमन्यू जेव्हा जखमी झाला  Shri Krishna

व रणांगणावर मृत्युची वाट पाहत पडला होता, तेव्हा त्याने शेजारी उभ्या असलेल्या कर्णाकडे पाणी मागितले.

तिथेच स्वच्छ पाण्याचे डबके होते.पण

अभिमन्युला पाणी देऊन आपल्या मित्राला म्हणजेच दुर्योधनाला दुखवायचे नाही, म्हणून कर्णाने मरण पंथाला लागलेल्या वीराला पाणी दिले नाही.नंतर

त्याच डबक्यात कर्णाच्या रथाचे चाक अडकून पडले आणि त्याचा शेवट झाला.


तात्पर्य :-

तुमच्या एका अन्यायकारक कृत्याने तुमच्या आयुष्यभराच्या प्रामाणिकपणाची किंमत एका क्षणात शून्य होवून जाते.!!


चांगले कर्म, निस्वार्थी सेवा, स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणाच शेवटपर्यंत माणसाला अमर ठेवते यात तिळमात्र शंका नाही.

       श्रीकृष्णार्पणमस्तु  Shri Krishna

Post a Comment

0 Comments